Homeक्राईमलाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल

नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस हवालदाराला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. लोकसेवक रामचंद्र राजाराम आडके, तत्कालीन पोलिस हवालदार, वर्ग-३, नाशिक तालुका पोलिस ठाणे याला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम १३(२) अन्वये चार वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिस कोठडी न घेता आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलिस हवालदार रामचंद्र आडके याने कथितरीत्या १५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले.
यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने पडताळणी करून सापळा रचला. २४ सप्टेंबर २०२४ रोजी गिरणारे आऊट पोस्ट येथे दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना आडके याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पूर्ण करून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन सुनावणीनंतर न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी आडके याला दोषी ठरवत वरील शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गिराडकर यांनी कामकाज पाहिले.

या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

अल्पवयीन मुलाकडून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, बाजारपेठ पोलिसांकडून एकाला अटक

0
अल्पवयीन मुलाकडून रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरू.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील पाटील मळा परिसरात मोटरसायकलवरून जात असलेल्या तुषार गोविंदा सोनवणे (वय-35 वर्षे, रा....

error: Content is protected !!