Homeक्राईमसावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

तक्रारदार यांनी सावकारी व्यवसायासाठी परवाना मिळविण्यासाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज केला होता. परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायकराव गरुड राहणार धुळे (वर्ग -३) यांनी २० हजार रुपये, तर प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जानार्दन विसपुते वय -६२ राहणार माऊली नगर,रेणुका माता मंदिर जवळ ,राजस्थान मार्बल पाठीमागे भुसावळ आणि प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे वय-४० राहणार ६१ विवेकानंद नगर,जिल्ह्या पेठ जळगांव यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये, अशी एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १५ जून रोजी भुसावळ येथील नाहाटा चौफुली परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी सुरेश विसपुते यांनी हेमंत काळे यांच्याशी फोनवर बोलून लाचेची रक्कम स्वीकारण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर तक्रारदारांकडून ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी विजय विनायकराव गरुड (सहकार अधिकारी), सुरेश जानार्दन विसपुते (प्रमाणित लेखापरीक्षक) आणि हेमंत प्रकाश काळे (प्रमाणित लेखापरीक्षक) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पथक तिसऱ्या संशयितास घेण्यासाठी धुळे येथे वरिष्ठांच्या आदेशावरून पाचारण करण्यात आले आहे.

कारवाई पोलीस उपअधीक्षक हेमंत नागोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!