Homeताज्या बातम्याराष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा फाट्यावर ग्रामस्थांचा 'रास्ता रोको'

राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा फाट्यावर ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी ;  प्राधिकरणाकडून बॅरिकेड्स हटविण्यासाठी हालचाली
भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वांजाळा फाटा येथे काही दिवसांपासून रस्ता ओलांडण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ते रोखण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंटचे बंरिकेट्स काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शनिवारी (ता.२४) रास्ता रोको आंदोलन केले,
गेल्या काही दिवसांपासून रस्ता ओलांडण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.या ठिकाणी नेहमीच स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात,ज्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता असते.
दोन दिवसांपूर्वी असाच एक भीषण अपघात टळला. दुचाकीवर ट्रिपल सीट (तीन तरुण) बसलेले तरुण चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्राला त्यांची दुचाकी जवळपास धडकणार होती.मात्र, ट्राला चालकाने प्रसंगावधान राखले आणि वेळीच ब्रेक मारल्याने दुचाकीवरील तरुणांचा जीव वाचला.ट्रक मात्र नियंत्रण सुटल्याने मध्यभागातील दुभाजकावर जाऊन आदळला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अपघात रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून वांजोळा फाटा येथे महामार्गाच्या दुतर्फा सिमेंटचे बॅरिकेट्स लावून रस्ता पूर्णपणे बंद केला होता.या निर्णयामुळे स्थानिक वांजोळा गावातील ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी ता.२४ रोजी सकाळी महामार्गावर रास्ता रोको करून सिमेंटचे बॅरिकेट्स काढण्याची मागणी केली.रास्ता रोको कर्त्यांनी घोषणाबाजी करून महामार्ग रोखला,ज्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळ पूर्णपणे विस्कळित झाली.दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांगा लागली होती आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
ग्रामस्थांच्या दबावामुळे आणि रास्ता रोको मुळे महामार्ग प्राधिकरणाला शेवटी सिमेंटचे बॅरिकेट्स काढण्यास भाग पाडले गेले.मात्र,या ग्रामस्थांनी कोणतीही पूर्वपरवानगी संबंधितांकडून  घेतली नव्हती,असे समजते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!