भोर, दि. २१ फेब्रुवारी २०२६: (संतोष भोर) राजगड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेंद्र श्यामसुंदर जायगुडे (वय २२, रा. केळवडे ता. भोर जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २१/०२/२०२६ रोजी दुपारी १.३० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान मौजे श्रीरामनगर, ता. हवेली जि. पुणे येथील कैलास हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली होंडा युनिकॉर्न (Honda Unicorn) दुचाकी क्रमांक MH-12-KZ-8993 हँडल लॉक करून पार्क केली होती.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय व फसवणुकीच्या हेतूने सदर दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. चोरीस गेलेल्या वाहनाची अंदाजे किंमत ४०,००० रुपये असून, वाहनाचे चॅसी क्रमांक ME4KCO9CCE8699164 व इंजिन क्रमांक KCO9E86709581 असे आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हवालदार प्रधान (बकल क्रमांक १५५६) करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक गवळी कार्यरत आहेत.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.




































