Homeक्राईमपतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव

दारूच्या नशेत मारहाण, जीवे ठार मारण्याच्या धमक्या; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ – घरगुती वादातून सुरू झालेला छळ सहन न झाल्याने एका ३० वर्षीय विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गंभीर आरोप करत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळ मलकापूर (जि. बुलढाणा) येथील असून सध्या भुसावळातील जाम मोहल्ला परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा विवाह ०५ एप्रिल २०१५ रोजी मलकापूर येथील सैय्यद समीर उर्फ बबलू उर्फ शाका डॉन याच्यासोबत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. या दाम्पत्याला चार अपत्ये आहेत.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, विवाहानंतर सुरुवातीची दोन वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर पती व सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणांवरून टोमणे, शिवीगाळ व दमदाटी सुरू झाली. पतीला दारूचे व्यसन असून तो नेहमी नशेत घरी येऊन मारहाण करतो, अश्लील शिवीगाळ करतो व जीवे ठार मारण्याच्या धमक्या देतो, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सासू, आजेसासू व दीर हे या प्रकाराला विरोध करत नसल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

नेमकी घटना :
२१ मार्च २०२६ रोजी ईद निमित्ताने फिर्यादी सासरी शिरखुरमा बनवत असताना पती दारूच्या नशेत घरी आला व कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर मारहाण केली. यावेळी गॅसची नळी ओढून जाळण्याची धमकी देत हातात चाकू घेऊन पाठलाग केल्याने घाबरलेल्या फिर्यादीने मुलांसह सासर सोडून भुसावळ येथे माहेरी आश्रय घेतला.

पुढील दिवशी २२ मार्च रोजी पती माहेरी येऊन ‘तू मला न सांगता येथे का आली’ असा जाब विचारत आई-वडिलांसमोरच चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी कुटुंबीयांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

या घटनेनंतर फिर्यादीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे पाठवले. त्यानंतर ०४ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा क्रमांक १२९/२०२६ दाखल करण्यात आला.

दरम्यान, १२ एप्रिल व २० एप्रिल रोजीही पती व दीर यांनी पुन्हा शिवीगाळ व दमदाटी करून छळ सुरूच ठेवला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. आरोपींनी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पती सैय्यद समीर सैय्यद सलीम, सासू रजियाबी सैय्यद सलीम, आजेसासू सैय्यद फातीमा सैय्यद रहिमान व दीर सैय्यद शकील सैय्यद सलीम (सर्व रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार तेजस पारसकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

error: Content is protected !!