भुसावळ शहरात गॅस रिफिलिंगच्या अवैध्य व्यवसायांवर पोलिसांचे छापे, मुद्देमाल हस्तगत करत कारवाई..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरात अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध्य व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दि.17 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या वेळेस बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाणे हद्दीत एकाच वेळी दोन छापे मारून कारवाई केल्याने गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये हडकंप माजला आहे. या कारवाईमध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 25 गॅस सिलेंडर/टाक्या, दोन रिफिलिंग मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच एक रिक्षा वाहन पोलिस कारवाई जप्त करण्यात आले.




































