Homeउद्योगभुसावळ रेल्वे स्थानकावर दीड कोटीच्या नकली नोटा जप्त; आर.पी.एफ ची मोठी कारवाई!

भुसावळ रेल्वे स्थानकावर दीड कोटीच्या नकली नोटा जप्त; आर.पी.एफ ची मोठी कारवाई!

भुसावळ रेल्वे सुरक्षा बल विभागाचे निरीक्षक पी.आर.मीना यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम एका बँग मध्ये नकली नोटा घेवून रेल्वे स्थानकावर वावरत आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : पटना-पुणे एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका युवकास भुसावळ रेल्वे स्थानकावर सुरक्षा बल पथकाने ताब्यात घेतले त्यांचे कब्जातुन एक बँग हस्तगत करण्यात आली असून त्यात पाचशे रुपये नोटांचे एकूण दीड कोटी रुपयांच्या नकली नोटा मिळून आल्या आहे. संशयितांचे नाव अक्षय क्षत्रुलाल सव्हेणे असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्याचा साथीदार फरार झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

खामगांव येथील राहणारा अक्षय क्षत्रुलाल सव्हेणे व त्याचा साथीदार महेश चोपडे हे दोघे खामगांव वरून मलकापूरला आले व तेथून पाचशे रुपये किंमतीचे नकली नोटांचे तीस बंडल (दीड कोटी) घेवून रेल्वे प्रवासाने भुसावळ स्टेशनला उतरले. तिथून पुढील प्रवास नाशिकच्या दिशेने करायचा असल्याने रेल्वेगाडीला वेळ लागणार होता, त्यामुळे दोघेही दारू पिण्यासाठी रेल्वेस्थानका बाहेर पडले. यादरम्यान रेल्वे सुरक्षा बल विभागाचे निरीक्षक पी.आर.मीना यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम एका बँग मध्ये नकली नोटा घेवून रेल्वे स्थानकावर वावरत आहे. या अनुषंगाने निरीक्षकांनी तात्काळ पथकास सोबत घेवून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची शोध मोहीम सुरू केला असता एक संशयित युवक फलक क्रमांक पाच व सहा जवळील रेल्वे पुलावर मिळून आला. हे पाहताच त्याचे साथीदार महेश चोपडा हा मागेच फरार झाला. युवकांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जातुन एक बॅग मिळून आली त्यात पाचशे रुपये किंमतीचे तीस बंडल नकली नोटांचे मिळून आले. सदरील संशयित अक्षय क्षत्रुलाल सव्हेणे यास ताब्यात घेण्यात आले, चौकशी दरम्यान अक्षय यांनी सांगितले की, नोटांची बँग मलकापूर वरून नाशिकला पोहचविण्याचे दोघांना दोन हजार रुपये कमिशन मिळणार होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस बंडल नोटांमध्ये वीस हजार रुपये किंमतीचे चलनी(खऱ्या) नोटा असून बाकी सर्व नकली असल्याचे कळते.

  • भुसावळ आर.पी.एफ बँकेला पत्र पाठवणार..

सदरील कारवाईत पाचशे रुपये किंमतीचे तीस बंडल नोटा आर.पी.एफ.अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळून आले असून यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाला आर.पी.एफ. पत्र व्यवहार करणार असून सदरील नोटा ह्या नकली आहेत की चलनी हे बँक रिपोर्ट आल्यानंतर निष्पन्न होईल. यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती रेल्वे स्थानक निरीक्षक पी.आर.मीना यांनी दिली.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ -  शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.५ रोजी तरुणासह त्याच्या...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन.. पोलीस वार्ता, नाशिक | पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित...

कर्तृत्वाला सलाम! विवरेत पोलीस हवालदार सुरज पाटीलांचा गौरव

0
रावेर (प्रतिनिधी) - पोलीस विभागात राहून जिवाची पर्वा न करता अनेक गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज...

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

error: Content is protected !!