Homeक्राईमजामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरातील साईनाथ नगर परिसरातील एका घरगुती गोदामावर टाकलेल्या छाप्यात ९ लाख १५ हजार ४१६ रुपये किमतीची १ हजार १६ HTBT कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून चार जणांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना जामनेर शहरातील वाको रोड परिसरातील साईनाथ नगर येथे दीपक राजमल चौधरी हा आपल्या घरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांचा साठा करून ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करण्यात आली.

पोलीस पथकाने ४ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. झडतीदरम्यान घरातील एका खोलीत ३९ पॅकबंद व एक उघडलेली अशा एकूण ४० गोण्यांमध्ये साठवून ठेवलेली १ हजार १६ कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ‘Diya-59 (KDCHH 02 BG II)’ आणि ‘Krish-45 (KDCHH 065 BG II)’ या वाणांचा समावेश असून त्यांची बाजारमूल्य ९ लाख १५ हजार ४१६ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान जप्त बियाण्यांवर उत्पादक म्हणून ‘गोल्ड किंग बायो जीन्स प्रा. लि., अहमदाबाद’ तसेच विक्रेता म्हणून ‘हायलंड हायब्रीड सीड्स, अहमदाबाद’ असा उल्लेख आढळून आला. मात्र, आरोपींकडे खरेदी, साठवणूक किंवा विक्रीबाबत कोणतेही वैध परवाने, बिले अथवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.

पुढील चौकशीत दीपक चौधरी याने गुलाब आधार पाटील, भूषण पाटील आणि तुकाराम कोळी यांच्या मदतीने ही बियाणे परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची माहिती समोर आली.
याप्रकरणी बियाणे निरीक्षक राज बळीराम हेपले यांच्या फिर्यादीवरून दीपक राजमल चौधरी (रा. साईनाथ नगर, जामनेर), गुलाब आधार पाटील (रा. वहीं, ता. चोपडा), भूषण पाटील (रा. वहीं, ता. चोपडा) व तुकाराम कोळी (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.
बेकायदेशीर व प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्री व साठवणुकीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.. पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...

इच्छापुर में कुछ ग्रामीणों का स्वास्थ्य बिगडा

0
बुरहानपुर जिले के इच्छापुर ग्राम में हर घर में दो-दो तीन-तीन पेशेंट पेट मरोडकर आना ,बार बार लैट्रिन के लिए जाना एवं उल्टी दस्त...

बुरहानपुर: केला किसानों की समस्याओं को लेकर किसान कांग्रेस का प्रदर्शन,सरकार पर लगाए गंभीर...

0
बुरहानपुर। (रमाकांत मोरे) मध्य प्रदेश एवं बुरहानपुर जिले के केला किसानों की विभिन्न मांगों को लेकर जिला किसान कांग्रेस कमेटी ने सरकार के खिलाफ...

धार भोजशाला में मां सरस्वती वाग्देवी दर्शन यात्रा एवं सामूहिक हनुमान चालीसा का आयोजन

0
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

0
भुसावळ - येथील लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध कारवाई करत सुमारे २१ हजार ११५ रुपयांचा गुटखा...

error: Content is protected !!