Homeक्राईममध्य रेल्वेने बनावट तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

मध्य रेल्वेने बनावट तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

मध्य रेल्वे तिकीट तपासकाने वातानुकुलीत लोकलमध्ये ३ बनावट युटीसद्वारे तयार केलेली तिकिटे ओळखली

दोषी प्रवाशांवर एफआयआर दाखल

मध्य रेल्वेचे तिकीट तपासक श्री. प्रशांत कांबळे यांनी २८.११.२०२५ रोजी वातानुकुलीत लोकलमध्ये बनावट युटीसद्वारे तयार केलेल्या सीझन तिकिटांसह प्रवास करणारे ३ प्रवाशी पकडले.काही दिवसांपूर्वी घडलेल्या अशाच दोन घटनांनंतर बनावट तिकिटांवर प्रवास करणारे प्रवासी ओळखले जाण्याचे हे आणखी एक प्रकरण आहे.

मुंबई विभागाचे प्रवासी तिकीट निरीक्षक श्री प्रशांत कांबळे यांना इतर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह आणि ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांसह ६.४५ वाजता परळ-कल्याण वातानुकुलीत लोकलमध्ये नियमित तपासणी दरम्यान ३ प्रवासी, म्हणजेच १ तरुणी आणि २ तरुणांना यूटीएस जनरेटेड सीझन तिकिटे दाखवणारे आढळले.

मोबाईल फोनमधील “माय फाइल्स-डॉक्युमेंट्स” या फोल्डरमधून ही तिकिटे उघडून दाखवण्यात आली होती. तिकीट परीक्षकांनी तिकिटे युटीस ॲपमधून उघडून दाखवण्यास सांगितल्यावर ती तिकिटे उघडता न आल्याने त्यांना संशय आला.

सर्व ३ युटीस सीझन तिकिटांची बारकाईने तपासणी केली असता, असे आढळून आले की सर्व ३ प्रवाशांचा UTS क्रमांक -XOOJHN4569 होता (प्रत्येक युटीस जनरेटेड तिकिटाचा नेहमीच वेगळा क्रमांक असतो), परंतु इतर तपशील वेगळे होते. त्यांनी ताबडतोब पुष्टीकरण मागितले आणि पडताळणीसाठी सर्व ३ प्रवाशांचे मोबाईल नंबर पाठवले ज्यावरून पुष्टी झाली की या क्रमांकांद्वारे कोणतेही तिकीट जारी केले गेले नाही आणि तयार केलेली युटीस तिकिटे बनावट असल्याची पुष्टी झाली.

श्री. निरज तलरेजा, श्री. अथर्व बाग आणि कु. अदिती मंगलुरकर अशी ओळख पटलेल्या प्रवाशांना आवश्यक कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलिस/कुर्ला यांच्याकडे सोपवण्यात आले.

त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की बनावट सीझन तिकिटे एआयने तयार केली होती. भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (बीएनएस) कलम ३१८/२, ३३६/३, ३३६/४, ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत बनावट तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल ३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

श्री. प्रशांत कांबळे यांच्या सतर्कतेने आणि तत्पर बुद्धिमत्तेमुळे आणखी एक बनावट तिकिट रॅकेट उघडकीस आले असून त्याचा तपास सुरू आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेने इतरांसाठी अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.

मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी अधिकृत विक्रेत्यांनी जारी केलेल्या वैध तिकिटांसह, रेल्वे स्टेशन बुकिंग काउंटरवरून किंवा एटीव्हीएमद्वारे प्रवास करावा. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर यूटीएस अॅप डाउनलोड करू शकतात आणि मोबाईल यूटीएस अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकतात.

मध्य रेल्वे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांविरुद्ध व त्यावर प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे. प्रवाशांना इशारा देण्यात येतो की बनावट तिकिटे तयार करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कोणत्याही फसव्या मार्गांचा अवलंब करू नये आणि अशा तिकिटांवर प्रवास करू नये.
या गुन्ह्यासाठी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंड किंवा कमाल ७ वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकतात.अशी माहिती डॉ.स्वप्नील निला,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!