Homeक्राईमभुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

भुसावळ – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा सोन्याचा हार व ३ ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग रस्त्यात पडून हरवल्या होत्या. दागिने हरवल्याची बाब लक्षात येताच त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.भारती काळे,गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर,कांतीलाल केदारे,योगेश माळी, हर्षल पाटील,अक्षय कोतकर व तोसीफ शेख,सिमा चौधरी, यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक रिक्षाचालक सोन्याचे दागिने उचलताना दिसून आला.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. त्याला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याने दागिने सापडल्याची कबुली दिली व मिळालेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.

पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार सोन्याचा हार व कानातील रिंग मूळ मालक अशपाक कुरेशी यांच्या ताब्यात देण्यात आल्या. पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेले दागिने परत मिळाल्याने तक्रारदारांनी बाजारपेठ पोलिसांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!