Homeराजकीयमहापुरुषांचा अपमान व महिलांविषयी अश्लील वक्तव्य करणाऱ्या भूषण पाटीलवर ‘मोक्का’ लावा

महापुरुषांचा अपमान व महिलांविषयी अश्लील वक्तव्य करणाऱ्या भूषण पाटीलवर ‘मोक्का’ लावा

रिपब्लिकन सेनेचा ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा

भुसावळ: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान, महिलांविषयी अत्यंत अश्लील वक्तव्ये आणि समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण भास्कर पाटील याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करून त्याला तातडीने जिल्ह्यातून तडीपार करावे, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

आरोपी भूषण भास्कर पाटील (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याने ६ आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फेसबुक लाईव्हद्वारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत नीच आणि अर्वाच्य भाषेत विधाने केली. तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची जाहीर धमकी देऊन कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR No. 0040/2026) दाखल झाला आहे.

आरोपीने केवळ महापुरुषांचाच अपमान केला नाही, तर स्त्रियांविषयी अत्यंत लज्जास्पद आणि अश्लील भाषेत टिपणी केली आहे. तसेच राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

रिपब्लिकन सेना निवेदनाद्वारे खालील मागण्या करित आहे :

१) आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर तात्काळ ‘मोक्का’ लावावा आणि जिल्हाबंदी (तडीपारी) करावी.
२) आरोपीचे फेसबुक अकाउंट कायमस्वरूपी ब्लॉक करण्यासाठी सायबर सेलने तातडीने पावले उचलावीत.
३) माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६७ आणि महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी वाढीव कलमे लावण्यात यावीत.
४) हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
“प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून २ दिवसांच्या आत आरोपीला जेरबंद करावे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही, तर रिपब्लिकन सेना आणि सर्व समाज बांधव जिल्ह्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील.”

विनोद सोनवणे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, जळगाव)

निवेदन देताना विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष
दिनेश इखारे जिल्हा नेते वंदनाताई सोनवणे महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई आराक जिल्हा महासचिव
देवदत्त मकासरे मेजर जिल्हा उपाध्यक्ष राजश्री ताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष बंटी नरवाडे अशांची उपस्थिती होती,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!