Homeआरोग्यनाशिक शहरात होमगार्ड दलाचे वाहतूक नियम कायद्यांविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न!

नाशिक शहरात होमगार्ड दलाचे वाहतूक नियम कायद्यांविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न!

पोलिसांना शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच अपुऱ्या मनुष्यबळामुळे सहाय्यक पथक म्हणून होमगार्ड पथकाची मद्दत घ्यावी लागते..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक मा.आदित्य मिरखेलकर साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचे प्रशासिक अधिकारी सुरेश जाधव, केंद्रनायक हरून तडवी, सामग्री प्रबंधक सुभेदार शांतीलाल निनावे, शहर समादेशक कंपनी नायक दिनेश पवार यासर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गंगापूर रोडवरील नाशिक पोलीस मैदान येथील हॉल मध्ये रविवारी, दि.15 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता शहर वाहतुक नियंत्रण व वाहतूक कायद्यांविषयी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र पोलीस दलाला राज्यात अंतर्गत सुरक्षा राखणे कामी सहाय्यकारी दल म्हणून महाराष्ट्र होमगार्ड संघटना नेहमी काम करत असते. पोलिसांना शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच अपुऱ्या मनुष्यबळामुळे सहाय्यक पथक म्हणून होमगार्ड पथकाची मद्दत घ्यावी लागते याच अनुषंगाने..
  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारे नियोजन,
  • वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई,
  • ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाई आणि दंड या विषयी माहिती दिली.
  • हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गाडीचे कागदपत्रे यासर्व बाबींची माहिती,
  • वाहतुकीच्या दंडात नव्याने झालेले वाढ आणि कायद्यातील बदल यांची माहिती,

  • रस्त्यावर चालताना सिग्नलचे पालन करणे,
  • अपघात किंव्हा इतर कारणामुळे झालेले वाहतूक कोंडी कशी नियंत्रणात आणावी आणि वाहतूक सुरळीत करावी,
  • पायी चालताना देखील सुरक्षेच्या दृष्टीने तो नियम पाळावे,
  • रोड सेफ्टीचे नियम आणि यासंदर्भात नागरिकांना जागृत करून त्यांना वाहतुकीचे नियम-कायदे पाळण्यास प्रवृत्त करणे.
या सर्व महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
नाशिक शहर वाहतूक शाखेतील कार्यरत पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी सर्व उपस्थित महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या जवानांना वाहतुकीच्या कारवाई आणि कायद्या संदर्भात मार्गदर्शन केले. यासाठी शहर समादेशक, कंपनी नायक दिनेश पवार यांनी पोह. सचिन जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करून आभार मानले.

यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचे प्रमुख अधिकारी तसेच शहर पथक पलटणनायक व लिपिक प्रशांत सुधाकर चौधरी, पलटणनायक सुमंत महाजन, पलटणनायक विनय शिंत्रे यांसह 138 पुरुष होमगार्ड आणि 60 महिला होमगार्ड जवान उपस्थित होते. या प्रकारच्या कार्यक्रम शिबिरातून यापुढे देखील वेळोवेळी होमगार्ड जवानांना कायद्याचे शिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात यावे. अश्या उपस्थितांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!