Homeताज्या बातम्यामध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने बनावट / तोतया रेल्वे दक्षता अधिकाऱ्याला पकडले

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने बनावट / तोतया रेल्वे दक्षता अधिकाऱ्याला पकडले

भुसावळ – मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने एका महत्त्वपूर्ण कारवाईत,रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याची खोटी ओळख दाखवून एका रेल्वे कर्मचाऱ्याकडून पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्याकडून प्राप्त माहिती व तक्रारीच्या आधारे मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कारवाईचे नियोजन करून ता.२२ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचला.या कारवाई दरम्यान तक्रारदाराकडून रु २०,०००/- स्विकारताना हरीश कांबळे याला दक्षता पथकाने रंगेहाथ पकडले.

आरोपी हरीश कांबळे याने स्वतःला रेल्वे बोर्डचा दक्षता निरीक्षक असल्याचे भासवून डीआरएम कार्यालय, मुंबई येथील थकीत वेतन मंजूर करून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून रु २०,०००/- ची मागणी केली होती.

यापूर्वी, आरोपी हरीश कांबळे याने तक्रारदाराकडून बदलीसाठी ६०,०००/- रुपये घेतल्याचा आरोप आहे, जी रक्कम ऑनलाइन पे करण्यात आली होती, परंतु बदली झालीच नाही. आरोपीने पुन्हा तक्रारदाराशी संपर्क साधून थकीत रकमेची लवकर परतफेड करून देण्याची ऑफर दिली. काहीतरी गैरप्रकार होत असल्याचा संशय आल्याने, तक्रारदाराने दक्षता विभागाशी संपर्क साधला आणि त्यानुसार एक कारवाईची योजना आखण्यात आली. श्री हरीश कांबळे याला २०,०००/- रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), कल्याणच्या ताब्यात देण्यात आले.

फसवणूक व तोतयागिरीच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता अधिनियम, २०२३ (BNS) मधील कलम ३१८(२) व ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३१८(२) अंतर्गत दंड व कमाल ३ वर्षांपर्यंत कारावास, तर कलम ३१९(२) अंतर्गत दंड व कमाल ५ वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मध्य रेल्वे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या आपल्या भूमिकेची पुनरुच्चार करत असून, रेल्वे कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही फसवणूक अथवा बनावट प्रकारांविषयी सतर्क राहून संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!