Homeक्राईमभुसावळला चाकू हल्ला ; दोन बालक जखमी !

भुसावळला चाकू हल्ला ; दोन बालक जखमी !

भुसावळ – शहरातील रजा टॉवर चौकात गुरुवारी दुपारी किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. अज्ञात इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात १३ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला असून,अन्य एक २० वर्षीय तरुणही जखमी झाला आहे.ता.१२ रोजी दुपारी चार वाजेला घटना घडली असून यात दोन बालक जखमी झाले आहे.या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास रजा टॉवर चौकात शेख समशेर शेख सलीम (वय १३) आणि मोहम्मद असत मोहम्मद अस्लम मेमन (वय २०) यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने हल्ला चढवला. यात १३ वर्षीय शेख समशेर याच्या डाव्या कानाजवळ चाकूचा खोलवर वार लागल्याने तो जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला.या झटापटीत मोहम्मद असत याच्या डाव्या मांडीवर चाकू लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय) येथे दाखल केले. दुसऱ्या जखमी तरुणावर सध्या भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेची नोंद बाजारपेठ पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही.
जखमींची प्रकृती स्थिर होताच त्यांचे जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. भरदिवसा आणि गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या हल्ल्यामुळे भुसावळकरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. भरचौकात धारदार शस्त्राने हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.“१३ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो काही काळ बेशुद्ध होता.प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्ह्या समान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे,” अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!