Homeक्राईमफेकरीतील संस्कृती नगरात दुहेरी घरफोडी : २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास

फेकरीतील संस्कृती नगरात दुहेरी घरफोडी : २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास

[ग्रामस्थांकडून स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी ]

भुसावळ – तालुक्यातील फेकरी येथील संस्कृती नगर परिसरात मंगळवार,दि.२८ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी घरफोडीच्या दोन घटना घडल्या असून,चोरट्यांनी सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,संस्कृती नगर परिसरातील रहिवासी संदीप अशोक वाघ हे रात्री ड्युटीवर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाज्याचा कोंडा तोडून आत प्रवेश केला.घरातील कपाटे उघडून सामानाची उधळण करून, २०,००० रुपयांची रोकड तसेच त्यांच्या आई उषाबाई वाघ यांच्या कपाटातील ५,००० रुपये अशी एकूण २५,००० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.दरम्यान,शेजारी राहणारे सोपान कोळी हे त्या रात्री गावाला गेल्याने त्यांच्या घरातील नुकसानीचे प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार मनोज उलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

या दुहेरी घरफोडीनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की,संस्कृती नगर परिसरात स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते,त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे.तसेच परिसरात वाढलेल्या गवत व झुडुपांमुळे चोरट्यांना लपण्यासाठी सोय होते,असेही नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याची आणि पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

फेकरीसारख्या शांत गावात अल्पावधीतच झालेल्या दुहेरी घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, ही घटना पोलीस प्रशासनासाठीही एक गंभीर इशारा ठरली आहे. पोलीसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने फिरविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!