भुसावळ – आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये या करीता पोलिस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेड्डी यांनी ता.८ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड स्था,गुन्हे शाखा,जळगाव यांना अवैध्यरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमां विरुध्द कठोर करावाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे राहुल गायकवाड,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्था,गुन्हे शाखा,जळगाव यांना गोपनिय माहीतगार यांचे कडुन गोपनिय माहीती मिळाली की,वरणगाव शहरातील रेकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले रा-वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी हा विना परवाना शस्त्र बाळगुन फिरत असून त्याद्वारे नागरिकांमध्ये दहशत माजवित आहे.
सदरील संशयित वरणगाव शहरातील तिरंगा चौकात येणार असले बाबत माहीती मिळाल्याने त्यांनी लागलीच स्था.गुन्हे शाखेतील त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. त्यांना वरील माहिती कळविल्या प्रमाणे सदर पथक हे वरणगाव येथे रिकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले रा-वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी यास जावुन ताब्यात घेणे बाबत आदेशीत केल्याने लागलीच वरील पथक शासकीय वाहनाने बातमीची खातरजमा करणे कामी वरणगाव शहरात तीरंगा चौकात पोहचले असता पथकास एक संशयित ईसम हा तीरंगा चौकातील झाडा जवळ साडे अकरा वाजेच्या सुमारास उभा दिसल्याने त्यास पथकातील पोलीस अंमलदार यांनी जागीच पकडले.त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गोपाळ चंडेले वय-५० रा-दर्यापुर शिवार,वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी असे सांगीतले.
त्यानंतर पोलीस पथकाने मिळुन आलेल्या संशयीतांची अंगझडती मध्ये ५०,५०० रुपये किमंतीचे २ गावठी पिस्तोल व १ जिवंत काडतुस मिळून आले आहे.
सदर कारवाई बाबत वरणगाव पो.स्टे. गु.र.क्र. २१३/२०२५, आर्म क्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ करित आहेत. तसेच नमुद गुन्हयात आरोपी नामे संजय गोपाळ चंडाले वय-५० रा-दर्यापुर शिवार, ऑर्डनेंस फॅक्टरी, वरणगाव यावर आधी आर्म अॅक्ट प्रमाणे वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.डॉ महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोख नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, यांचे मर्गदर्शनाखाली पो.उ.निरी. शरद बागल, ग्रे पो उनि रवी नरवाडे पोहेकों गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ.उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकों प्रशांत परदेशी, पोकों राहुल वानखेडे तसेच चापोकों भारत पाटील अशांनी केली आहे.




















