एल.सी.बी व बाजारपेठ ठाण्यांची संयुक्त कारवाई
भुसावळ – (निलेश फिरके ) शहरातील जामनेर रोडवरील नवजीवन सोसायटी, शिंधी कॉलनी भागात १८ नवलकुंज घराच्या तिसऱ्या मजल्यावर दोन इसम एक लॅपटॅप व तीन मोबाईलवरून बेंट फेअर ७७ या मोबाईल अँप मधून भारत विरुद्ध पाकिस्थान या मॅच मधील बॅटिंग व बॉलिंगचे भाव माहीत करून लोकांकडून स्वतःच्या फायद्यासाठी जुगारांची कंटिंग घेतांना स्थनिक गुन्हे शाखा व बाजारपेठ ठाण्याचे पथकास ता.२१ रोजी रात्री अकरा वाजेला मिळून आल्याने संयुक्त कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले.प्रकाश कारडा व रणजित हंडी असे संशयित आरोपींचे नावे आहेत.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की,भुसावळ शहरातील शिंधी कॉलनी भागात भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच मधील बॅटिंग व बॉलिंगचे भाव माहीत करून प्रकाश हुदांमल कारडा ( वय.५५) राहणार १८ नवलकुंज,नवजीवन सोसायटी शिंधी कॉलनी भुसावळ तसेच रणजित चंद्रभान हंडी (वय.३५) राहणार गणपती नगर जळगांव हे दोघे लोकांकडून जुगारांची कंटिंग घेत असतो. सदरील पथकातील पोउपनिरी.शरद बागुल, पंढरीनाथ नरवाडे,गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील,विकास सातदिवे,राहुल वानखेडे,दर्शना पाटील,भारत पाटील,अशांना दालनात बोलावून छापा बाबत माहिती दिली.सदरील पथक खाजगी वाहनाने भुसावळला रवाना होवून मिळालेल्या माहितीची खात्री करून ता.२१ रोजी रात्री साडे नऊ वाजेला पोहचले व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना छाप्या बाबत माहिती दिली त्यावरून सदरचा छापा हा बंद घरात असलेने पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्याकडून कारवाई साठी परवानगी घेवून पोलीस कर्मचारी रमण सुरळकर,सोपान पाटील,योगेश माळी,अमर अढाले अशांना सदरची माहिती दिली.सदरील पथक रात्री अकरा वाजेला शिंधी कॉलनी भागात पोहचून घराची कडी ठोठावली.पंचा समक्ष घरात प्रवेश केला असता खोलीमध्ये एक लॅपटॉप,तीन मोबाईल,एक कल्यूलेटर,२९ स्लिप छापलेल्या पडलेल्या दिसल्या असद एकूण (१,०५५००) एक लाख पाच हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरील कारवाई महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत प्रशांत रमेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























