संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या कमरेला पाठीमागील बाजुस अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस, चोवीस हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल मिळून आले.
पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव साहेब यांना गुप्त बातमी मिळाली होती की, ऑडर्नन्स फॉक्टरी मेन गेट, साई मंदीरजवळ, वरणगाव येथे एक इसम नामे अमर परदेशी हा अवैध गावठी कट्टा बाळगुन दहशत निर्माण करीत आहे. त्यानुसार तात्काळ वरणगांव पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. रामदास गांगुर्डे, पोलीस हवालदार यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, प्रशांत ठाकुर, ईश्वर तायडे, विजय बावस्कर यांच्या पथकाला दालनात बोलावून सदर बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले असता पथकाने संशयितांकडून अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.



























