Homeताज्या बातम्या२१ कोटी ४८ लाखांच्या भरपाईचा अहवाल सादर

२१ कोटी ४८ लाखांच्या भरपाईचा अहवाल सादर

आमदार एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याला यश ; मुक्ताईनगर सिंचन घोटाळा प्रकरण
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुक्ताईनगर मनुर येथील मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजनेतील कथित गैरव्यवहार आणि शासकीय साहित्याच्या चोरीप्रकरणी अखेर २१ कोटी ४८ लाख रुपयांच्या भरपाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे.आमदार एकनाथ खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
मुक्ताईनगर येथील पंप हाऊसमधील अधिकृत परवानगी किंवा लिलाव न करता शासकीय साहित्याची तोडफोड व चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत आमदार खडसे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाने सादर केलेल्या तज्ज्ञ अहवालानुसार या प्रकरणात पंप, एमएस पाइपलाइन, एअर व्हॉल्व्ह, मॅनिफोल्ड हेडर, नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह तसेच इतर महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित साहित्याचे योग्य मूल्यांकन न करता ते हटविण्यात आल्याने शासनाचे मोठे नुकसान झाले असल्याचे अहवालात नमूद आहे.
प्रशासनाने संबंधित विभागीय अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, २१ कोटी ४८ लाख रुपयांची भरपाई वसूल करण्याची कार्यवाहीही हाती घेण्यात आली आहे. योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीही आवश्यक निधीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार खडसे यांनी केली आहे. या प्रकरणामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्हा प्रशासनाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

error: Content is protected !!