बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दि.24 ते 26 मे दरम्यान प्रवेश करून घरातील सोन्या व चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा विभागांना दिले आहेत.
याच अनुषंगाने मुंबईनाका पोलीस ठाण्यात एक घरफोडीच्या घटनेचा गुन्हा दाखल झाला होता. ज्यात फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दि.24 ते 26 मे दरम्यान प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते. यावरून गुरनं- 169/2025 भा.न्या.सं.कलम 331(3)(४), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हेशाखा युनिट 1 आणि 2 यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आला.
गुन्हेशाखा पथकाने घटनास्थळी भेट देवुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ज्यात दोन संशयित घरफोडी करून जातांना दिसले. सीसीटीव्हींच्या माध्यमातून आणखी काही किलोमीटर पर्यंत पाहणी केली. शहर गुन्हेशाखेंचे पोह. महेश साळुंके, पोअं. राहूल पालखेडे, सपोनि हेमंत तोडकर व पोह. प्रकाश महाजन यांनी मिळून तांत्रिक माहीतीच्या आधारे अज्ञात आरोपी निष्पन्न करून सदर घरफोडी करणाऱ्यांची नावे शोधून काढली व तशी खात्री केली. त्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना गुन्हेशाखा युनिट-1 चे पोअं. आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, शोध घेत असलेले आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या एमएच 05 ईजे 4298 या इर्टीगा गाडी मध्ये चोरीचे सोने-चांदीचे दागिने घेऊन विक्रीसाठी त्रंबकेश्वरकडून पहिणे रोडकडे येणार आहेत, ही बातमी वपोनि. मधुकर कड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाने पोउपनि. चेतन श्रीवंत, पोह. महेश साळुंके, रेमश कोळी, पोअं. राहूल पालखेडे, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, विलास चारोस्कर, श्रेणी पोउपनि. किरण शिरसाठ, पोअं. समाधान पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावला.
आरोपी त्रंबकेश्चर ते पहीनेरोड दरम्यान पांढऱ्या इटिंगा गाडीसह दिसताच त्यांना पकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे 1) नाबीद अल्ताफ हाशमी (वय-25) रा. फ्लॅट नं-1, नाज्झी हॉस्पीटल जवळ, द्वारका नगरी, नाशिक, 2) शेहबाज जावेद खान (वय-29) रा. श्रीजी अपार्टमेंट, फ्लॅट न.-101, वडाळा रोड, नाशिक, 3) उत्तम धोंडीराम मुंजे (वय-30) रा. पेगलवाडी, अंजनेरी ता.त्रंबकेश्वर जि.नाशिक, 4) महेश मधुकर व्यवहारे (वय-27) रा. पाचआळी, भांगरे गल्ली, ता.त्रंबकेश्वर जि.नाशिक अशी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून 36 तोळे सोन्याचे दागिने, 204.7 ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण 38,57,700/- रू किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात आरोपीत नावीद अल्ताफ हाशमी हा फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र असून तो गुन्हा घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी हजर राहून पोलीसांच्या तपासावर लक्ष देत होता व पोलीसांचा तपास भरकटण्यासाठी दिशाभूल करत होता हे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आणि सदर गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 आणि 2 यांकडून संयुक्तरित्या करण्यात आली. ज्यात सपोनि. हिरामण भोये, पोउनि. चेतन श्रीवंत, पोउपनि. सुदाम सांगळे, पोअं. विलास चारोस्कर, श्रेणी पोउपनि. किरण शिरसाठ, पोह. देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, उत्तम पवार, सपोनि. समाधान हिरे, अतूल पाटील, मनोज परदेशी, काळे, शेळके तसेच तांत्रिक शाखेचे सपोनि. जया तारडे, योगेश वाजे, हर्षद महाले, भुषण पवार, संदीप बर्डे या सर्वांचा सहभाग असून त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...