Homeक्राईमपिपंरी चिचवड पुणे परिसरातील कुख्यात गुन्हेगारांना दरोड्याची पूर्व तयारी करतांना अटक

पिपंरी चिचवड पुणे परिसरातील कुख्यात गुन्हेगारांना दरोड्याची पूर्व तयारी करतांना अटक

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा- शहरात रात्री १०:४५ वाजेचा सुमारास चोपडा शहर पो.स्टे.पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार चोपडा शहर पोलिसांनी मामलदे शिवारात चोपडा ते चुंचाळे रोडवर शिताफीने मोटर कार क्र-एम.एच.१४ ए एस- ७९०५ या अंधारात निर्जन स्थळी थांबलेल्या मोटर कारचा शोध घेवुन तिच्यातील ६ इसमांना ताब्यात घेतले. सदर वाहनामध्ये लोखंडी टॉमी, मिरची पुड, दोर हे घरफोडी व जबरी चोरी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळुन आले. एकदरीत सदर इसम काहीतरी गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी थांबले असल्याचा संशय बळावल्याने नुमद इसमांचे काही गुन्हेगारी रेकार्ड आहे का याची तपासणी केली असता त्यापैकी ३ इसमांवर खुन, दरोडा, जबरी चोरी. खंडणी. दंगल, आर्म अॅक्ट अशां गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे येथील पिंपरी चिंचवड व निगडी या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी चिचंवड पोलीसांना संपर्क केला असता नमुद इसम हे कुख्यात व अतिशय धोकादायक गुन्हेगार असल्याची माहिती दिली. सदर इसम हे दरोड्याची तयारी करुनच चोपडा येथे थांबल्याचे निष्पन्न झाल्यावरुन त्यांचे ताब्यातील मोटर कार, मोबाईल फोन, रोख रक्कम, लोखंडी टाँमी, मिरची पुड, दोर असा एकुण १०,८१,०००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय साहिता कलम ३१० (४) ३१० (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि एकनाथ भिसे हे करीत असुन मिळुन आलेल्या इसमांपैकी ३ इसम हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्यायमंडळ जळगांव येथे पाठविण्यात आले असून उर्वरीत ३ इसम नामे १) तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे वय-२५ वर्ष रा.उर्वल सोसायटी निगडी पिंपरी चिचंवड जि.पुणे २) विनोद राकेश पवार वय-२५ वर्ष रा. दत्तनगर चिंचवड जि. पुणे ३) सुनिल गोरख जाधव वय-३० वर्ष रा.दत्तनगर चिंचवड जि.पुणे यांना अटक करुन दि-२६ रोजी मा. चोपडा न्यायालय यांचे कडे हजर केले असता त्यांना दि २९ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

नमुद आरोपी पैकी विनोद राकेश पवार याचे वर पिंपरी पोलीस ठाणे पुणे येथे खुन, घरफोडी, दरोडा जबरी चोरी, आर्म अॅक्ट, दंगल असे गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल असुन तुषार गौतम झेंडे याच्यावर निंगडी पो.स्टे. तसेच पिंपरी पोलीस ठाणे येथे खुन, घरफोडी, दरोडा जबरी चोरी, आर्म अॅक्ट असे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच सुनिल गोरख जाधव याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीचा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याचा प्लॉन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हाणून पाडला आहे.

सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेव घोलप याचे मार्गदर्शनाखाली चोपडा, उपविभाग वाचे सुचना प्रमाणे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे, सफौ दिपक विसावे, जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोहेकाँ लक्ष्मण शिंगाणे, पोहेकाँ हर्षल पाटील, महेंद्र साळुके, पोना संदिप भोई, पोकों विनोद पाटील, पोकों निलेश वाघ, पोकों प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, गजेंद्र ठाकुर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों को हरसंभव सहायता मिलेगी : प्रभारी मंत्री श्री तुलसीराम...

0
सर्वे कार्य गंभीरता, निष्पक्षता एवं सक्रियता से करने के निर्देश बुरहानपुर - जल संसाधन विभाग एवं जिले के प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने,जिले में...

सीएम से मुलाकात के अगले दिन खेतों में पहुंचे सांसद-नेपानगर विधायक, किसानों को दिलाया...

0
दरियापुर रैयत में किसान चौपाल आयोजित, अधिकारियों को पारदर्शी सर्वे और शीघ्र मुआवजे के निर्देश बुरहानपुर (रमाकांत मोरे)  आंधी-तूफान और बारिश से प्रभावित केले की फसल...

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

error: Content is protected !!