Homeताज्या बातम्यातापी नदीकाठी ५२८७ गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन

तापी नदीकाठी ५२८७ गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ४४८ श्रीसदस्यांचा उपक्रम; १८ टन निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविले

भुसावळ : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २५) तापी नदीकाठी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूंना भुसावळ व यावल तालुक्यातील एकूण ४४८ श्रीसदस्यांनी निर्माल्य संकलनाचे काम केले. या उपक्रमादरम्यान घरगुती तसेच विविध गणेश मंडळांच्या ५ हजार २८७ गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलित करण्यात आले. संकलित निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी एकूण सात ट्रॅक्टर वापरण्यात आले.

संकलनानंतर श्रीसदस्यांनी निर्माल्याचे तत्काळ विलगीकरण केले. त्यातील सुमारे १८ टन निर्माल्य वृक्षांसाठी खतनिर्मिती करण्याच्या उद्देशाने श्री समर्थ बैठक, अट्रावल येथे पाठविण्यात आले. उर्वरित निर्माल्याची स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निर्माल्य संकलन उपक्रमाला तापी नदी परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी आपल्या घरातील तसेच गणेशोत्सवातील निर्माल्य विश्वासाने श्रीसदस्यांकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे, अनेक नागरिकांनी यापुढे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये संकलित न करता पर्यावरणपूरक पद्धतीने देण्याचा स्वैच्छिक संकल्प केला.

पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कौतुक केले. धार्मिक उत्सवांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री गणेश जी को मातृशक्ति महिलाओं ने दी अनंत चतुर्दशी पर बिदाई

0
जयपुर (रमाकांत मोरे) के गोविंद राय जी के रास्ते पर समाजसेविका सीता विजय जी के घर में गणेश जी की स्थापना की गई थी ।...

सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श अधिकारी पुरस्कार!

0
पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचा समितीला अभिमान आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी...

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून 20 वर्षीय संशयित ताब्यात!

0
महिलेचा पाठलाग करणे, अश्लील शिवीगाळ करणे आदी आरोपांशी संबंधित संशयित ताब्यात.. पोलीस वार्ता, भुसावळ | अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 20 वर्षीय...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

error: Content is protected !!