भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील कॉमन सर्व्हिस सेंटर,गांधी नगर भागातून ता.२९ रोजी रात्री साडे बारा वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनला बाळू कापसे यांनी डायल ११२ वरून फोन येताच पोलीस अधिकारी व कर्मचारी कामाला लागल्याने चांगलीच तारांबळ उडाली.
बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हर्षल महाजन,मनोज गाळफडे हे ता.२९ रोजी रात्र गस्त करीत होते.ठाणे अंमलदार पंकज शेळके हे ड्युटी करीत असतांना रात्री १२.३६ वाजेच्या दरम्यान डायल ११२ वर फोन आला.” माझ्या भावाचा खून झाला.” तात्काळ मदत पाठवा. ठाणे अंमलदार यांनी डायल ११२ वरील मेसेज वाचल्यानंतर रात्र गस्त करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना फोन वर बोलणी करून तात्काळ कॉमन सर्व्हिस सेंटर,गांधी नगर परिसरात जाण्यास सांगितले.पोलीस कर्मचाऱ्यांनी गांधी नगर,पंधरा बंगला,डी.एल.हिंदी हायस्कुल असे संपूर्ण परिसर पिंजून काढला.मात्र खून झाल्याचे असे एकही संकेत पोलिसांना मिळाले नाही.डायल ११२ वरील फोन करणारे बाळू कापसे यांच्या घराची माहिती काढून पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता त्याचे घरगुती भांडण सुरू होते.
डायल ११२ वर बाळू कापसे यास विचारपूस केली असता दारूच्या नशेत असल्याने डायल ११२ चा कॉल प्रमाणे नसून कॉलर यांनी नशेमध्ये चुकीची माहिती दिली.डायल ११२ वर खोटी माहिती पुरवून पोलिसांची दिशाभुल करून खोटी माहिती पुरवली आहे म्हणून पोलीस कर्मचारी मनोज भागवत गाळफडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम २१२,२१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























