भुसावळ – शहरातील रामायण नगर,कंटेनर रोड,प्लॉट नंबर ७३ येथील राहत्या घराच्या पोर्च मध्ये असलेल्या मोठ्या स्टुलवर चढून गच्चीवर

जावून गच्चीचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चार लाख ३२ हजार रुपये किंमतीचे सोने – चांदीचे दागिने तसेच बजाज कंपनीची इंडिक्शन शेगडी व सायकल चोरून नेल्यांची घटना ता.६ रोजी रात्री सव्वा अकरा ते ता.९ रोजी दहा वाजेच्या दरम्यान घडली.कृष्ण कुमार मोहन पाठक (वय.६०) सेवानिवृत्त आर.पी.एफ कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.१० रोजी गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास पोउपनिरी मंगेश जाधव करीत आहे.

























