( स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई )
मुक्ताईनगर – पोलीस स्टेशन हद्दीतील मानेगांव येथे एका इसमाने आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ गांजाची लागवड केलेली असल्याची गोपनिय बातमीदाराकडुन स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना दि.१९ रोजी माहिती मिळाली.
सदर मिळालेल्या गोपनिय माहितीचे गांभीर्य लक्षात घेता मा.श्री डॉ महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक,जळगांव,मा.श्री संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभार अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, व मा. श्री सुभाष ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर उपविभाग,मुक्ताईनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड यांना तात्काळ तपास पथक तयार करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन मुक्ताईनगर येथील मानेगाव येथे छापा टाकुन कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे मुक्ताईनगर पो.स्टे. हद्दीतील मानेगाव येथे जावून कायदेशीर बाबींची पुर्तता करुन छापा कारवाई करुन आरोपी नामे मनोज नामदेव घटे वय ४० वर्ष रा. मानेगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यास ताब्यात घेवुन त्याचे शेतातून ५१ गांजाची झाडे वजन ३४१ किलो ५०० ग्रॅम (३ क्विटल ४१ किलो ५०० ग्रॅम किं. अं. २३,२२,२००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी मनोज नामदेव घटे वय ४० वर्ष रा. मानेगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगांव याचे विरुध्द मुक्ताईनगर पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत,
सदरची उल्लेखनीय कार्मागरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव मा. श्री संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभार अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, व मा. श्री सुभाष ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर उपविभाग, मुक्ताईनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, सोपान गोरे, पोहेकी सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, पोकों/छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी, चालक पोकों/भरत पाटील तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, श्री आशिष अडसूळ, सपानि जयेश पाटील, पोउपनि निलेश गोसावी, पोहेकॉ चंद्रकांत बोदडे, पोना/मोतीलाल बोरसे, पोकों/चेतन महाजन, रविंद्र धनगर, दिपक ठाकरे, गोविद पवार, श्रावण भिल, जितेंद्र महाजन यांनी केली आहे.


























