Homeक्राईमऑपरेशन ‘ड्रॉप केस’ : मुक्ताईनगरातील पाच गावांवर जळगाव पोलिसांचा पहाटेचा सर्वात मोठा...

ऑपरेशन ‘ड्रॉप केस’ : मुक्ताईनगरातील पाच गावांवर जळगाव पोलिसांचा पहाटेचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

मुक्ताईनगर, ता. १९ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा व इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत धडक कारवाई करत मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. सुमारे २०० पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, गावठी कट्टे, काडतुसे, वन्यप्राण्यांची कातडी, वाहने व मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, जुने सोने, सेकंड करन्सी, डबल इंजिन आदी कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ प्रसारित करून देशभरातील नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. आमिषाला बळी पडलेले नागरिक गावात आल्यानंतर त्यांची फसवणूक, लूटमार अथवा जबरी चोरी केली जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात मागील तीन वर्षांत दरोड्याचे १०, खुनासह दरोड्याचा १, खुनाचा १, जबरी चोरीचे ७, फसवणुकीचे १६, दरोड्याचा प्रयत्न १ आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याचे २ गुन्हे दाखल झाले आहेत.

या विशेष मोहिमेत गुन्हा क्रमांक ३२२/२०२१ मधील फरार आरोपी विलास नरविलाल पवार (रा. हलखेडा) तसेच गुन्हा क्रमांक २५७/२०२६ मधील आरोपी अजय दादा पवार (रा. हलखेडा) यांना अटक करण्यात आली.

कारवाईदरम्यान सुमारे २० लाख रुपये रोख रक्कम, ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ३० लाख रुपये), ४ किलो चांदीचे दागिने (अंदाजे किंमत ८ लाख रुपये), दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरण, कोल्हा व सशाचे कातडे, चार चारचाकी व सहा दुचाकी वाहने तसेच ३० मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

याशिवाय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मधापुरी येथील फरेज राजू पवार व हलखेडा येथील रामजाने राईसाहेब भोसले यांच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्वर व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर काही आरोपींकडून लाखो रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

गुन्हेगारीविरोधातील निर्णायक पाऊल मानल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चौकट : जप्तीचा थोडक्यात आढावा
रोख रक्कम : २० लाख रुपये
सोन्याचे दागिने : ३०० ग्रॅम (अंदाजे ३० लाख रुपये)
चांदीचे दागिने : ४ किलो (अंदाजे ८ लाख रुपये)
गावठी कट्टे : २
जिवंत काडतुसे : ३
वन्यप्राण्यांची कातडी : ३
चारचाकी वाहने : ४
दुचाकी वाहने : ६
मोबाईल फोन : ३०

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

0
सातारा (रमाकांत मोरे) जिल्ह्यातील उंब्रज येथील महिला समाज सेविका मीनाक्षीताई पोळ यांच्यातर्फे उंब्रज येथील गरजू महिलांना 430 ब्लॅंकेट चे वाटप दिनांक 17 6 2026...

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

error: Content is protected !!