Homeउद्योगइंदिरानगर हद्दीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी अखेर गुन्हेशाखा युनिट-2 च्या ताब्यात!

इंदिरानगर हद्दीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी अखेर गुन्हेशाखा युनिट-2 च्या ताब्यात!

गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो बाहेर राज्यात पळून गेल्याचे समजले होते..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दि.15 मार्च 2025 रोजी दाखल करण्यात आलेल्या गु.र.नं 85/2025 ह्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो बाहेर राज्यात पळून गेल्याचे समजले होते.
सविस्तर वृत्त असे की, दि.14 मार्च 2025 रोजी फिर्यादी हे रिक्षाने घरी जात असतांना दोंदे याच्या किराणा दुकानासमोर फिर्यादीचे ओळखीचे स्वप्निल सोनकांबळे व त्याचे साथीदार यांनी फिर्यादीस तुझ्यामुळे आमचा नट्याभाई गेला असे बोलुन मागील भांडणाची कुरापत काढुन फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली आणि कोयत्याने फिर्यादीवर गंभीर वार करून जखमी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच फिर्यादीच्या रिक्षावर कोयते मारून रिक्षाचे नुकसान केले, फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम 4 हजार रूपये जबरदस्तीने काढुन घेतले. घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे वरिल प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
पण बरेच दिवस उलटूनही आरोपी मिळत नव्हता परंतु दि.14 मे 2025 रोजी गुन्हेशाखा युनिट-2 चे पोलीस पथक शोध घेत असताना पोह. मनोहर शिंदे व पोअं. तेजस मते यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर तांबे हा साठे नगर, वडाळा गाव, नाशिक या भागात फिरत आहे.
हि माहिती त्वरित गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि. हेमंत तोडकर यांना कळविली. आणि त्यांच्या मार्गदर्शनात पोह. मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोअं. तेजस मते, सुनिल खैरणार यांचे पोलीस पथक तयार करून माहीतीनुसार साठे नगर, वडाळागाव या ठिकाणी जावून सापळा लावला. व शिताफिने मयूर अशोक तांबे (वय-28), रा. म्हसोबा मंदीराच्या पाठीमागे, मोरवाडी गाव सिडको, नाशिक याला ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता त्याने कबुली दिली. त्याच्यावर गुरन 85/2025 भा.न्या.सं.कलम 109(1), 115(2), 119(1), 3(5) 324(2) सह भा.ह.का. कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यामुळे आरोपीस पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. यशवंत बेडकोळी, सपोउनि. बाळु शेळके यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!