घागबारी, शाळेचे आदर्श संस्थापक, आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थ्यांचे सहकार्य.
हतगड पोलीस वार्ता :- सुरगाणा तालुक्यातिल घागबारी येथील अँड. डी. टी. जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी, येथील आदर्श संस्था, आदर्श संस्थापक माननीय कॉम्रेड जे. पी. गावित साहेब, आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी संस्थापकांचा आदर्श ठेवूनच शिक्षक व विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्य वणी ते सापुतारा हायवे रस्त्याची घागबारी (भिंतबारी )

फाट्याजवळ रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले असून तेथे अपघात होत होते व वाहन चालकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत होती. ह्या खड्डयांची डागडूजी करणे शासनाचे काम असुन शासन याकडे दुर्लक्ष करत होते. ह्या रस्त्यातील खड्डयांची दखल घागबारी येथील अँड. डी. टी. जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी, आदर्श संस्था, आदर्श संस्थापक मा. कॉम्रेड जे. पी.गावित साहेब, आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी संस्थापकांच्या सामाजिक कार्यांचा आदर्श ठेवूनच शिक्षक व विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यातुन भितबारी हायवे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे खडी, मुरुम, माती, टाकून बुजवण्यात आले असून तात्पुरत्या स्वरूपात अपघात होण्यास प्रतिबंध होईल. याकामी घागबारी शाळेचे प्राचार्य. कुवर एन. एस. सर, सह शिक्षक, रौंदळ सर, सुर्यवंशी सर, खैरनार सर, खैरनार मॅडम, गायकवाड सर, बोरसे सर, पवार सर, गावित सर, जाधव सर, पवार सर, कोरडे मॅडम, महाले सर, बागुल दादा, यांचे सहकार्य लाभले असून, वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
✍️पोलीस वार्ता न्युजसाठी :- मनोहर जाधव, सुरगाणा.



































