Homeउद्योगअवैधरीत्या कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर यवतमाळ पोलीस गुन्हे शाखेची धडक कारवाई!

अवैधरीत्या कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर यवतमाळ पोलीस गुन्हे शाखेची धडक कारवाई!

वाहनाची पाहणी केली असता त्यात कोंबून ठेवलेल्या अवस्थेत 60 गोवंशीय बैल आढळून आले. वाहनातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले,

गोहत्यासाठी वाहतून करणारा कंटेनर ताब्यात..

पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा उपविभागात गोवंश तस्करीविरोधात पोलीसांकडून मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवैधरीत्या कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश वाहतूक करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.17 मार्च 2025 रोजी पांढरकवडा उपविभागातील अवैध धंद्यांविरुद्ध आणि उघड गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याच्या दृष्टीने गस्त घालत असताना पथकाला खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, नागपूर येथून एक कंटेनर गोवंशीय बैल कत्तलीसाठी पांढरकवडा मार्गे हैदराबाद येथे वाहतूक होणार आहे. ही माहिती मिळताच यवतमाळ गुन्हे शाखा पथकाने तातडीने पांढरकवडा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी गावाजवळ सापळा लावला होता. काही वेळातच नागपूरकडून संशयास्पदरीत्या येणारा कंटेनर क्र.TS07 UE5029 दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले व त्याची चौकशी केली, वाहनाची पाहणी केली असता त्यात कोंबून ठेवलेल्या अवस्थेत 60 गोवंशीय बैल आढळून आले. वाहनातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची विचारपूस केली असता त्यांनी बैल हैद्राबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे- संतोष भरलाल लोधा, वय 59, रा.फुलपुरा, ता.सारंगपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश, मशीद अली रशीद अली, वय 28, रा.दांडीयावाडी, ता.सारंगपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश, शाकीर अली अमानत अली, वय 50, रा.दांडीयावाडी, ता.सारंगपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश, अशी आहेत.

यवतमाळ पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची आणि आरोपींची झडती घेतली. या कारवाईत पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • एक कंटेनर वाहन किंमत अंदाजे 30,00,000 रुपये,
  • 60 गोवंश बैल किंमत अंदाजे 15,00,00 रुपये,
  • 3 मोबाईल फोन किंमत अंदाजे 3,000 रुपये,
  • रोख रक्कम 2,200 रुपये,
एकूण 45 लाख 5 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई प्रकरणी आरोपींविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकारी अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, तसेच स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके यांनी परिश्रम घेऊन ही मोठी कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. सध्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!