Homeआरोग्यपोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक आणि प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढून शांततेत सण...

पोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक आणि प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढून शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन!

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच शहरात सर्व सण शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वणी पोलिसांचा रूट मार्च..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी शहर व तालुका परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच शहरात सर्व सण शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वणी पोलिसांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवार दि.26 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील टिळक चौक येथे पोलिसांनी दंगा काबू प्रात्यक्षिक केले. तसेच शहरातील शासकीय मैदानावर दि.28 ऑगस्ट 2025 रोजी, सकाळी 11:30 वाजता पोलिसांचे दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक (Mock Drill) करण्यात आले. त्यानंतर वणी शहरातील प्रमुख मार्गांवरून वस्तीतून रूट मार्च काढण्यात आला.

या प्रात्यक्षिकात सहभागी होऊन उपविभागातील शिरपूर, पाटण, मुकुटबन, मारेगाव पोलीस ठाण्याचे पो.अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड भाग घेतला. दंगा नियंत्रण वेळी जमावाला पांगवण्यासाठी लागणाऱ्या विविध कृती आणि साधनांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कवायत निर्देशक सपोफौ. बाबुसिंग राठोड, पोहेकॉ. श्रीकांत जयस्वाल, मपोहेकॉ. अर्चना सुपारे, मपोकॉ. पुजा जुमनाके यांनी सर्व प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन याप्रसंगी केले.

प्रात्यक्षिकामध्ये लाठी, हेल्मेट, शिल्ड, गॅस गन, गॅस ग्रेनेड, पंप ॲक्शन गन, एस.एल.आर. रायफल, अश्रू शेल, लाँग रेंज शेल, स्टन शेल, वूड पियर्सिंग सेल, डाय मार्कर सेल अश्या पोलीस उपयोगी शस्त्रांची माहिती देण्यात आली. यावेळी वणी उपविभागीय पोअधि. मा.सुरेश दळवे, वणी पोनि. गोपाल उंबरकर उपस्थित होते. प्रात्यक्षिकामुळे पोलिसांमध्ये ऊर्जा वाढेल व शहरात कायदा व शांतता राखण्यास पोलिसांना मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण प्रात्यक्षिकांमध्ये 1)वणी पोलीस ठाण्याचे 5 अधिकारी, 25 अंमलदार व 20 होमगार्ड तसेच 2)शिरपूर पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी, 5 अंमलदार, 3)मारेगाव पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी, 5 अंमलदार, 4)पाटण पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी, 4 अंमलदार व 3 होमगार्ड, 5)मुकुटबन पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी, 1 अंमलदार व 3 होमगार्ड आणि पो.मुख्यालय येथील एस.एफचे 9 अंमलदार असे एकूण 9 अधिकारी, 49 अंमलदार व 26 होमगार्ड सहभागी होऊन उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!