Homeउद्योगSSC RESULT; राज्यातील दहावीचा निकाल जाहीर, एकूण 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी...

SSC RESULT; राज्यातील दहावीचा निकाल जाहीर, एकूण 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी निकालात मारली बाजी!

परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : आज दहावीचा निकाल जाहीर झाला, दहावीची परीक्षा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. शैक्षणिक दृष्ट्या यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 2024-2025 या वर्षात दहावीच्या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पार करावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज दि.13 मे रोजी जाहीर झाले. राज्यात एकूण 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले आहे. तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन देखील केले आहे.

  • उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या..

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 58 हजार 20 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 94.10 अशी आहे.

  • दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय..

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील 8,844 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.27 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले आहे.
  • मुलींची आघाडी..

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 96.14 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.31 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या एकूण 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 23 हजार 489 शाळांपैकी 7924 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 88 हजार 745 विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर 4 लाख 97 हजार 277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

  • विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.82 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.78 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 94.81, छत्रपती संभाजीनगर विभागात 92.82, मुंबई विभागात 95.84, कोल्हापूर विभागात 96.87 अमरावती विभागात 92.95, नाशिक विभागात 93.04 आणि लातूर विभागात 92.77 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.
  • निकाल पाहण्यासाठी तुम्ही खालील संकेतस्थळावर भेट देऊ शकता..
👉SSC RESULT..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!