Homeउद्योगशहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, म्हसरूळ भागातून दोन आरोपी कोयता व...

शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, म्हसरूळ भागातून दोन आरोपी कोयता व चॉपरसह अटकेत

शिवीगाळ, आरडाओरड करून रहिवाश्यांना धमकावत होता तसेच लोकांच्या मागे लागत असल्याने तेथील लोक, महिला घाबरून सैरावैरा पळत होते..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर, गुन्हेगारांचा तपास करणे व अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार शहरात तपास करत असताना नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकातील पोअं विलास चारोस्कर यांना दि.25 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की, दोन जण हातात धारदार हत्यार घेऊन राजगृह बुध्दविहार, दिंडोरीरोड, म्हसरूळ परीसरातील येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धमकावून दहशत माजवत आहे. सदर माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि डॉ. अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि सुदाम सांगळे, पोह रमेश कोळी, रविंद्र आढाव, महेश साळुंके, रोहिदास लिलके, पोअं विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, गोरक्ष साबळे, मपोअं. अनुजा येलवे, पोअं. समाधान पवार यांचे पोलीस पथक तयार करून माहितीच्या आधारे म्हसरूळ परिसरात जाऊन सापळा लावण्यात आला. काही वेळातच दोन संशयित दिसून आले त्यातील एकाच्या हातात धारदार कोयता दिसला, तो ओरडत होता “भैचोद, मादरचोद अश्या शिवीगाळ करून मी या भागातील भाई आहे, कोणी माझ्या समोर आला तर त्याला कापून टाकतो” असे मोठमोठ्याने आरडाओरड करून रहिवाश्यांना धमकावत होता तसेच लोकांच्या मागे लागत असल्याने तेथील लोक, महिला घाबरून सैरावैरा पळत होते.

गुन्हेशाखा पथकाने हे बघताच त्याचा पाठलाग करून त्याच्या हातातील कोयत्या ताब्यात घेतला. आणि दोघा दहशत पसरवणाऱ्यांना पकडून त्यांची नावे विचारले, त्यांनी नावे 1) हर्ष प्रदिप काकडे (वय-21), रा. ओमकार नगर, किशोर सुर्यवंशीमार्ग, म्हसरूळ नाशिक, 2) राज संजय भोये (वय-19) रा. अश्वमेध नगर, आर.टी.ओ ऑफीस जवळ, पेठरोड, पंचवटी, नाशिक असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत एक कोयता, दोन कोपर असे एकुण 1500/- रूपये किंमतीचे हत्यारे जप्त करण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत असून त्यातील हर्ष प्रदिप काकडे याच्यावर..
1) म्हसरूळ पोलीस ठाण्यात गु.र.नं- 63/2022, 85/2023, 130/2023, 172/2024, 135/2025,
2) पंचवटी पोलीस ठाण्यात गु.र.नं- 301/2024 या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

तसेच आरोपी राज संजय भोये यांच्यावर..
1) पंचवटी पोलीस ठाण्यात गु.र.नं- 35/2023, 154/2024 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. दोघा आरोपींविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. चेतन श्रीवंत, श्रेणी पोउनि. किरण शिरसाठ, उत्तम पवार, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!