Homeक्राईमरिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला..

पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी भारतीय दलित पँथरच्या वतीने स्थानिक शाखा कार्यकर्त्यांना बसण्यासाठी एक बाकडा लावण्यात आला होता. कालांतराने या बाकड्याने एक ऐतिहासिक ओळख निर्माण केली. जो कोणी राजकीय कार्यकर्ता या बाकड्यावर बसेल तो राजकीय जीवनात नगरसेवक आमदार खासदार होतो अशी या बाकड्याची ख्याती निर्माण झाली. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी देवळाली कॅम्प शहरात आल्यानंतर या बाकड्यावर बसल्याशिवाय जात नसत. या दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीयमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब. माजीमंत्री गंगाधरजी गाडे, माजीमंत्री अविनाशजी महातेकर साहेब, जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुणजी कांबळे, माजीमंत्री बबनरावजी घोलप, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, हेमंत आप्पा गोडसे यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अनेक आजी माजी नगरसेवक यांच्यासाठी हा बाकडा लकी ठरला आहे.
पण दि.19 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला आहे. पहाटे वॉकिंगसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हि बाब येताच या ऐतिहासिक बाकड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वपक्षीय सर्व धर्मीय नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. देवळाली येथील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने दि.20 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांची भेट घेऊन शहराध्यक्ष पंडितजी साळवे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली व ज्या समाजकंटकाने या बाकड्याची तोडफोड केली त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांना करण्यात आली आहे.
यावेळी शिष्टमंडळात रिपाईचे नेते सिद्धार्थ पगारे, गौतम पगारे, आर. डी. जाधव, अशोक साळवे, पंडित साळवे, महेंद्र सोनवणे, शिवसेना नेते माजी नगरसेवक दिनकर पाळदे, सुरेश कदम, देविदास गोडसे, मंगेश शिंदोडे, अंबादास पवार, कामगार नेते गणेश काळे, रिपाई पदाधिकारी रवींद्र गांगुर्डे, पद्माकर दोंदे, राजाभाऊ वाघमारे, शामदास आडके, संतोष भडांगे, संतोष गायकवाड, प्रकाश किरवे, कलीमभाई पठाण, विजय निकम, शिवा मोरे, कुंदन दोंदे, शैलेश पगारे, संदीप धिवरे, योगेश लोखंडे, राकेश भालेराव, दिलनवाज खान यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

error: Content is protected !!