Homeक्राईमनातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जच्या जाळ्यात अडकवण्याचा कट; खंडणी उकळण्याचा होता डाव?

नातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जच्या जाळ्यात अडकवण्याचा कट; खंडणी उकळण्याचा होता डाव?

रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा; आरोपीला अडकवून खंडणी मागण्याचा होता डाव..

पोलीस वार्ता जळगाव | शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणात तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाला त्याच्याच एका नातेवाईकाने जाणीवपूर्वक ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्याच्या कुटुंबाकडून खंडणी मागण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी जतीन रविंद्र सैंदाणे आणि एमडी ड्रग्ज पुरवठादार आरोपी चेतन दत्तात्रय वानखेडे ऊर्फ चंदू सोनार या दोघांना पोलीसांनी अटक केली असून दि.31 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील शिव कॉलनी परिसरात दि.29 जुलै रोजी पोलीसांनी कल्पेश सतीष रायसिंग (वय-26 वर्षे, रा. वालकी, ता.चोपडा) याला मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थासह अटक केली होती. या प्रकरणी एन्टीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास करण्याचे आदेश जळगाव पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शोध पथकाला दिले होते.

सदर तपासादरम्यान अटकेत असलेल्या आरोपी कल्पेश रायसिंग याने पोलिसांना सांगितले की, त्याचा नातेवाईक जतीन सैंदाणे याने वारंवार जळगाव येथे जेवणासाठी येण्याचा आग्रह केला होता. त्याच्या आग्रहावरून तो जळगावला आला असताना पोलिसांनी त्याला अडवून मोटारसायकलच्या सीटखालून एमडी पावडर जप्त केली. मात्र ही पावडर आपल्या गाडीत कशी आली याची कोणतीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि चौकशीच्या आधारे तपासाची दिशा बदलली. तपासात जतीन सैंदाणे हा शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याने कर्जबाजारी झाल्याचे तसेच त्याला एमडी ड्रग्जचे व्यसन असल्याचे निष्पन्न झाले. संशय बळावल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने धक्कादायक कबुली दिली.

चौकशीत जतीनने भुसावळ येथील चेतन दत्तात्रय वानखेडे ऊर्फ चंदू सोनार याच्याकडून एमडी ड्रग्ज विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर दि.15 जुलै रोजी अमळनेर येथे जाऊन कल्पेश रायसिंगच्या मोटारसायकलच्या सीटखाली एमडी पावडर ठेवली. पुढे दि.28 जुलै रोजी जेवणाच्या बहाण्याने त्याला जळगावला बोलावून स्वतःच पोलिसांना गुप्त माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘तोडीपाणी’ करून त्यातून स्वतःला आर्थिक लाभ मिळेल, तसेच पोलीसांशी ओळख असल्याचे भासवून कल्पेशच्या वडिलांकडून पैसे उकळता येतील, या उद्देशाने हा संपूर्ण कट रचल्याची कबुली त्याने दिली. या तपासात एमडी ड्रग्ज पुरवठादार म्हणून चेतन दत्तात्रय वानखेडे ऊर्फ चंदू सोनार याचाही सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे जतीन सैंदाणे आणि चेतन वानखेडे या दोघांना अटक करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 61(2) अन्वये गुन्हेगारी कटाचा आरोपही वाढविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

error: Content is protected !!