Homeक्राईमभुसावळ शहरात कालिका मंदिराजवळ खून; अज्ञाताविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

भुसावळ शहरात कालिका मंदिराजवळ खून; अज्ञाताविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

संतोष मनचल कुटुंबापासून वेगळे राहत, गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते झेडटीएस येथील कालिका माता मंदिरात वास्तव्यास होते..

पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील झेडटीएस परिसरातील रेल्वे रुळांजवळ असलेल्या कालिका माता मंदिराच्या ओट्यावर राहणारे संतोष रघुवीर मनचल (वय 55 वर्षे) यांचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना दि.29 जून 2026, सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मनचल यांना दारूचे व्यसन असल्याने ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते झेडटीएस परिसरातील कालिका माता मंदिरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा अधूनमधून त्यांची भेट घेत असे व जेवणाचा डबा देत असे. रविवारी (दि.28 जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नातेवाईकांनी त्यांना मंदिराच्या ओट्यावर बसलेले पाहिले होते.

सोमवारी दि.29 जून सकाळी सुमारे 9:19 वाजता मित्र इमरान खान याने संतोष मनचल यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांच्या मुलाला फोनवरून दिली. त्यानंतर मुलगा मंदिरात पोहोचला असता संतोष मनचल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या तोंड व नाकातून रक्तस्त्राव होत होता, जबडा सुजलेला होता तसेच छातीवर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांना डायल 112 वर संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवला. रविवारी सायंकाळी 7:30 ते सोमवारी सकाळी 9:19 या कालावधीत अज्ञात व्यक्तीने गंभीर मारहाण करून संतोष मनचल यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास शहर बाजारपेठ पोलीस ठाणे करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

HSRP नंबर प्लेट; 1 जुलैपासून वाहनांवर पोलीस व परिवहन विभाग करणार दंडात्मक कारवाई

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP नंबर प्लेट अनिवार्य अन्यथा आरटीओ मधील अनेक सुविधा मिळणार नाहीत.. पोलीस वार्ता, मुंबई | राज्यात वाहनांना HSRP...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

28 जून मध्यरात्रीपासून ते 12 जुलै रात्री 12.00 वाजेपर्यंत आदेश लागू राहतील.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस...

बुरहानपुर पुलिस द्वारा साइबर जागरूकता

0
"सेफ क्लिक" 2.0 अभियान के तहत जागरूकता कार्यक्रम आयोजित* अभियान के तहत ग्राम पंचायतों एवं सार्वजनिक स्थान में साइबर चौपाल लगाकर दी जानकारी अभियान के तहत...

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीच्या 30 दुचाकींसह चोरटे ताब्यात!

चोरीच्या एकूण 30 दुचाकी, किंमत 25 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन अटकेत.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध...

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

error: Content is protected !!