Homeशिक्षण-प्रशिक्षणमनसे दणका: उंब्रज महाविद्यालयातील 'त्या' विकृत प्राध्यापकाची सेवा २४ तासात समाप्त !

मनसे दणका: उंब्रज महाविद्यालयातील ‘त्या’ विकृत प्राध्यापकाची सेवा २४ तासात समाप्त !

सातारा: (मीनाक्षी पोळ)  जिल्ह्यातील उंब्रज येथील मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या विकृत प्राध्यापकावर कारवाई करण्यासाठी अमोल सुभाष कांबळे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. मनविसेच्या आक्रमक इशाऱ्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने अवघ्या २४ तासांत संबंधित प्राध्यापकाची सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त केली आहे.

सदर महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलीस तक्रार होऊनही महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. या अन्यायाविरुद्ध मनविसेचे सातारा जिल्हा सचिव श्री. अमोल सुभाष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. कारवाई न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
मनविसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे रयत शिक्षण संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) यांनी आज अधिकृत पत्र काढून संबंधित प्राध्यापकाची नियुक्ती रद्द करून त्याला संस्थेतून बडतर्फ (Relieve) केल्याचे आदेश दिले आहेत.

“विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही नराधमाला मनविसे सोडणार नाही. हा केवळ एका प्राध्यापकावर झालेली कारवाई नसून, अशा प्रवृत्तींना दिलेला एक कडक इशारा आहे. रयत शिक्षण संस्थेने तत्परतेने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही सदैव सतर्क राहू.” अमोल सुभाष कांबळे (जिल्हा सचिव, मनविसे, सातारा)

या यशस्वी लढ्यात मनविसेचे जिल्हा सचिव अमोल कांबळे, शहर अध्यक्ष विजय वाणी, पारस प्रभाळे, शिवराज जाधव, तेजस शिंदे, शुभम भिंगारदेवे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात 14 मे मध्यरात्रीपासून 28 मे रात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 14 मे 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 28 मे 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश.. पोलीस वार्ता, नाशिक : शहर...

सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ‘बोधचिन्हाचे’ सह्याद्री अतिथीगृह येथे अनावरण!

कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.. पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027...

हिंगोली येथे चौथा सर्वधर्मिय विवाह सोहळा संपन्न..

0
हिंगोली (मीनाक्षी पोळ)  येथे आज दिनांक12 मे 2026 रोजी शहरातील हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथे संबोधी ॲकडमी महाराष्ट्र, सरस्वती महिला सेवाभावी संस्था व हिंगोली...

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल!

सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.. पोलीस वार्ता, पुणे : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

error: Content is protected !!