मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रचाराची सांगता होणार..
पोलीस वार्ता, मुंबई : राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025-26 यासाठी उमेदवारांना प्रचार करण्याची शेवटची मुदत ही 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. वेळ संपल्यावर उमेदवाराला इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित यांसह इतर अन्य माध्यमानी कुठलाही निवडणूकविषयक प्रचार, प्रसार जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ मध्ये नमूद केल्या आहेत.
यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी इच्छुकांना मार्गदर्शन केले. उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे, परंतु सूचक आणि अनुमोदकाचे नाव मात्र उमेदवार निवडणूक लढवत असलेल्याच प्रभागात असणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवारास आणि अपक्ष उमेदवारासही प्रत्येकी एक सूचक आणि एका अनुमोदकाची आवश्यकता असते. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात नामनिर्देशनपत्र भरू शकतात; परंतु एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येते आणि एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात. या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारीउपस्थित होते.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...