यावल – तालुक्यातील आमोदा येथे सकाळी सावदा येथील गोविंद शेठ यांच्या केळी ग्रुपची गाडी आमोदा येथील मोर नदी पुलावर सकाळी साडे सात ते आठ च्या दरम्यान आयशर गाडी क्रमांक एम एच 43 Y. 05 74 ही गाडी रोझोदा गाते, सावदा,निंभोरा कळमोदा कोचुर नंतर हिंगोणा, भोकर, खिरोदा, येथील केळी वाहतूक करणारे कर्मचारी यांना जामनेर केळी काढण्यासाठी गाडी जात होती मोर नदी पुलावर गाडी पलटी झाली यात २३ जखमी कामगारांच्या फैजपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
सलीम तडवी हिंगोणा, हुसेन तडवी सावदा, संजय पाटील रोझोदा, फिरोज तडवी सावखेडा पवन मेढे रोझोदा, फकीरा तडवी खिरोदा, राजू तडवी रोझोदा, सादिक तडवी, अकसन तडवी हिंगोणा आशिक तडवी हिगोणा, भास्कर मेढे रोझोदा, शादिक तडवी हिगोणा, साकीत तडवी हिगोणा, सुरेखा अटकाडे रोझोदा, संजय अटकाडे रोझोदा, चंद्रकांत तायडे रोझोदा, आशा पाटील रोझोदा, देवराज लहासे भोकरी, अमित तडवी हिगोणा, सरला तायडे रोझोदा, पिंटु तायडे गाते, महेंद्र तायडे कोचुर, सलीम तडवी कळमोदे
त्यात ठिकाणी केदार लक्झरी गाडी क्रमांक एम एच 19 वाय 57 46 गर्दीतून पुढे काढतांना लक्झरी गाडीने मोटरसायकल क्रमांक एम एच 19 ए डब्ल्यू 94 48 या मोटरसायकलला धडक दिली त्यात वासुदेव फेगडे वय 35 व आमोदा येथील किरण पाटील यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांच्या दोघांच्या पायांना जबर दुखावत झालेली आहे
Attached Media




































