Homeआरोग्यशहर काँग्रेस कमिटीचा वणी नगरपरिषदेवर मोर्चा, नवीन मालमत्ता कर हुकुमशाही पद्धतीने लादल्याचा...

शहर काँग्रेस कमिटीचा वणी नगरपरिषदेवर मोर्चा, नवीन मालमत्ता कर हुकुमशाही पद्धतीने लादल्याचा आरोप

वणी नगरपरिषदेने 2024-2025 या वर्षापासून वाढवलेल्या जादा मालमत्ता करवाढी विरोधात वणी काँग्रेस कमिटीच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे..

पोलीस वार्ता, वणी : राज्यात सर्वच महानगर आणि नगरपालिका, नगरपरिषदांच्या मालमत्ताकरांमध्ये गेल्या काही वर्षापासून वाढ होत असून लोकांना या आर्थिक बोज्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद यांमध्ये प्रशासक बसले असून सध्या नगरसेवक, लोकप्रतिनिधी नसल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार असा प्रश्न जनतेसमोर आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहर नगरपरिषदेने देखील आपले नवीन मालमत्ता कर पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवून जमा करण्यात सुरुवात केली आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी नोटिसा देखील देण्यास सुरुवात केली असून अचानक वाढलेल्या या जादा मालमत्ता करामुळे नागरिक हताश होऊन वणी नगरपरिषदेवर रोष व्यक्त करत आहे.
वणी नगरपरिषदेने 2024-2025 या वर्षापासून वाढवलेल्या जादा मालमत्ता करवाढी विरोधात वणी काँग्रेस कमिटीच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे. नगरपरिषदेने कुठलाही ठराव न करता हे जादा कर आकारले असून पुढील चार वर्ष वणी करणार हे कर लागू राहतील त्यामुळे तत्काळ वाढीव कर रद्द करावे. यासाठी सोमवार दि.22 सप्टेंबर 2025 रोजी वणी नगरपरिषदेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला होता. यावेळी वणी काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून यवतमाळ जिल्हाधिकारी यांना मुख्याधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नागरिक आधीच महागाई, वीजेचे वाढते दर, GST यांमुळे त्रस्त आहे. त्यात वणी नगरपरिषदेने वाढवले सक्तीचे कर, यासाठी नगरपरिषदेने कुठलीही समिती तयार केलेली नाही अथवा ठरवा करण्यात आलेला नाही. फक्त अधिकारी हुकुमशाही पद्धतीने असे निर्णय जनतेवर लादत आहे. त्यामुळे ही अवैध कर सक्ती रद्द करावी लागेल आणि वणीकरांना याला बळी पडू देणार नाही. वणी शहरात दोन-तीन वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. पावसाळ्यात देखील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शहरातील खड्ड्यांचे रस्ते त्यात साचलेले पाणी, शहरातील घाणीचे साम्राज्य, वाढलेली झाडेझुडपे यासह वणी नगरपरिषदेने शहराच्या साफसफाईकडे केलेले दुर्लक्ष हे सर्व महत्त्वाचे विषय आहे. असे काँग्रेस नेते संजय खाडे यांनी म्हटले आहे. तसेच सक्तीचा जादा कर रद्द न केल्यास वणीतील नागरिकांसोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभे केले जाईल. असा इशारा निवेदनातून काँग्रेसने दिला आहे.
यावेळी आंदोलन मोर्चात अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, रामदास कुचनकर, संदीप कांबळे, रवी कोटावर, राजू डवरे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रेमनाथ मंगाम, कैलास पचारे, सुधीर खंडाळकर, कैसर पटेल, ओम ठाकूर, विकेश पानघाटे, अशोक पांडे, राजू अंकितवार, गणेश बोंडे, तोशीब अहमद, सुमित डवरे, विनीत तोडकर, संजय शेंडे आणि नरेंद्र काटोके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता टीम : दिवाकर साखरकर, वणी (यवतमाळ)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!