Homeआरोग्यनाशिकरोड मधील रामदेव ट्रेडिंग कंपनी आणि श्री स्वामिनाथ ट्रेडर्स यांच्याकडे मिळाला संशयास्पद...

नाशिकरोड मधील रामदेव ट्रेडिंग कंपनी आणि श्री स्वामिनाथ ट्रेडर्स यांच्याकडे मिळाला संशयास्पद भेसळयुक्त तुपाचा साठा!

सण उत्सव काळात नागरिकांनी देखील मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतांना काळजी घ्यावी. तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळल्यास तक्रार FDA का तक्रार करावी..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचाच फायदा घेऊन नफेखोर भामटे भेसळयुक्त पनीर, खवा, तेल, तूप बाजारात विक्रीसाठी आणतात याच अनुषंगाने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा या मोहिमेचाला सुरुवात केली असून मिठाई व तत्सम पदार्थ तपासणी जिल्ह्यात केली जात आहे.

याच तपासणी नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वीच भेसळयुक्त खवा व पनीर साठा जप्त करत नष्ट केला होता आता दि.19 सप्टेंबर, 2025 रोजी पुन्हा संशयित भेसळयुक्त 1 लाख 35 हजार 790 रुपये किंमतीचा तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहती सह आयुक्त दि.ज्ञा.तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि.11 सप्टेंबर 2025 रोजी मे.रामदेव ट्रेडिंग कंपनी, आशा नगर कॉलनी, भगवती निवास, व्यापारी बँकेजवळ, नाशिकरोड यांच्या पेढीत (फर्म) मध्ये कमी दर्जाचे तूप विक्रीसाठी असल्याचे कळाले, त्यामुळे तिथे जाऊन संशयित तुपाचा साठा आढळून येताच तो संपूर्ण 31 हजार 390 रुपये किंमतीचा 43 लिटर तुपाचा साठा जप्त करून तुपाचे नमुने परीक्षणासाठी पाठवले.
त्यानंतर दि.17 सप्टेंबर 2025 रोजी मे.श्री.स्वामिनाथ ट्रेडर्स, जयभवानी रोड, नाशिकरोड यांच्या पेढीत (फर्म) कमी दर्जाचे तूप विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या पेढीची तपासणी केली असता येथे विनापरवाना तूप या अन्नपदार्थाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यावेळी संशयित तुपाचे 2 नमुने घेवून उर्वरित 1 लाख 4 हजार 400 रुपये किंमतीचा 145 लिटर तूप साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
जप्त सर्व तुपाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. ‘संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, सहा. आयुक्त मनिष सानप, सह.आयुक्त दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनात तपासणी मोहीम राबवण्यात येत असून अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील पनीर व खवा उत्पादक यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तरी व्यापाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. सण उत्सव काळात नागरिकांनी देखील मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतांना काळजी घ्यावी. तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळल्यास तक्रार तसेच गोपनीय माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्र.1800222365 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सह.आयुक्त तांबोळी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अक्षय तृतीया पर उड़ान लिनेस क्लब बुरहानपुर की सराहनीय पहल : वृद्ध आश्रम में...

0
रमाकांत मोरे बुरहानपुर | अक्षय तृतीया के पावन अवसर पर, जहाँ समाज में लोग सोना-चांदी और भौतिक वस्तुओं की खरीदारी में व्यस्त हैं, वहीं उड़ान...

भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावे – उमेश नेमाडे

0
भुसावळ : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही...

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

error: Content is protected !!