पावसाळ्यात विरकुड-मोहोर्ली रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे चालकांना व स्थानिकांना इथून प्रवास अवघड झाला आहे..
पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी तालुक्यातील बोर्डा गावात विरकुड-मोहोर्ली या रस्त्याच्या झालेल्या वाईट अवस्थेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात आले.
पावसाळ्यात विरकुड-मोहोर्ली रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे चालकांना व स्थानिकांना येथून प्रवास करणे अवघड झाले असून खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. नागरिकांना पाठीच्या, मणक्याच्या समस्या निर्माण झाल्या असून खड्ड्यांमध्ये पडून अनेक दुचाकी धारक जखमी झाले आहे. परंतु याकडे रस्ते बांधकाम प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून अजूनपर्यंत कुठलेही दखल घेण्यात आलेली नाही. या समस्येविषयी स्थानिक नागरिकांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी प्रशासनाला निवेदन दिले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 9 सप्टेंबर 2025 रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामस्थ आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुस्त बांधकाम विभागाविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. तसेच लवकरच रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीची कामे सुरू झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती
भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...