भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील मधुर वाईन शॉप या दुकानात अनोळखी दोन इसमांनी दारूची बाटली घेवून पैसे देण्यास नकार देवून दुकानात काउंटर वर ठेवलेले २२०० रुपये बळजबरीने चोरुन नेल्याची घटना रविवार ७ रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी पंकज घनशाम जंगले वय ४५ वर्षे,हॉटेल व्यवसाय,राहणार आदर्श नगर, जळगाव यांचे भुसावळ येथील मधुर वाईन शॉप या दुकानात अनोळखी दोन इसम आले व त्यांनी दारुचे बाटली घेवून पैसे देण्यास नकार देवुन,फिर्यादी व साक्षीदार यांना धक्क बुक्की करुन,शिवीगाळ व दमदाटी करून दुकानातुन जात असतांना काउंटरवर ठेवलेली अंदाजे २२०० रुपये बळजबरीने चोरुन नेल्याने ता.८ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल वाघ,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव,विजय नेरकर, प्रशांत सोनार,योगेश माळी,महेंद्र पाटील, अमर अढाळे,भुषण चौधरी,रवींद्र भवसार यांनी प्रथम तांत्रीक तपास करून फुटेजवरुन आरोपीचे नाव निष्पन्न केले व त्यानंतर प्रशांत सोनार यांना मिळालेले गोपनीय माहीती वरुन सदर गुन्हयातील आरोपी यांना कंडारी रेल विद्युत कारखाना कॉलनी येथुन रीतीक भगवान निदाने वय २५ वर्षे,राहणार वाल्मीक नगर, भुसावळ.मिहीर दिलीप तायडे वय २५ वर्षे, राहणार केशव नगर,हडपसर, पुणे या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले असून जेलबंद करण्यात आले.दोघे संशयिताकडून चोरलेले गुन्ह्यातील रक्कमेपैकी ७८० रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे.


























