पोलिसांकडून आरोपींचा शोध चालू होता. परंतु गंभीर जखमी राहुल धोत्रेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले..
पोलीस वार्ता नाशिक : शहरातील नांदूरनाका परिसरातील दिंडे मळा, जनार्दन नगर या भागात दि. 22 ऑगस्ट 2025 व रोजी सायं 6 वाजेच्या सुमारास धोत्रे व उद्धव निमसे या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे रुपांतर गंभीर हाणामारीत झाले. यावेळी राहुल संजय थोत्रे व त्याचा आते भाऊ अजय कुसाळकर यांचा पाठलाग करून आरोपी सुमित हांडोरे याने चॉपरने वार करून व इतर साथीदारांनी लाकडी व लोखंडी दांडक्याने त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांने आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली होती त्यावरून दि. 23 ऑगस्ट रोजी गुरन – 266/2025 भा.न्या.सं. कलम 109, 189(2), 189(4), 190, 191, 192, 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. व पोलिसांकडून आरोपींचा शोध चालू होता. परंतु गंभीर जखमी राहुल संजय धोत्रेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचे वाढीव कलम 103(1) सह. मपोका 135 लावण्यात आले.
वरिष्ठांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पथक करत असताना पोह. प्रशांत मरकड व मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी संतोष मते हा वाडीवऱ्हे गाव, कवटी फाटा, नाशिक येथे येणार आहे. गुन्हेशाखा पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री करून तेथील गणेश वडापावच्या समोरील पंचवटी अमृततुल्य येथून आरोपी संतोष बाळू मते (वय-40) रा- दिंडेवाडा, मारूती मंदीरजवळ, नांदुरगाव, नाशिक यास ताब्यात घेतले. तसेच दुसऱ्या आरोपीचा शोध चालू असताना गुन्हेशाखेच्या पोह. विशाल देवरे व प्रविण वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी स्वप्नील बागुल हा सातपूर, पपया नर्सरी जवळ येत आहे. पथकाने सदर ठिकाणी जाऊन शिताफीने आरोपी स्वप्निल मदन बागुल (वय-33) रा- नांदुरगाव, जुना राजवाडा, बुध्दविहारच्या मागे, नाशिक यास ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींना गुन्हेशाखेचे वपोनि मधुकर कड यांच्या समोर हाजीर करून त्यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले. आरोपींना विचारपुस करताच त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यामुळे पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई नाशिक शहर पोआ. मा.श्री. संदिप कर्णिक व पोउप-आ. गुन्हे मा.श्री. किरणकुमार चव्हाण, सहापोआ, गुन्हेशाखा मा. संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाकडून वपोनि.मधुकर कड यांच्या आदेशाने करण्यात आली. पथकात पोउनि. चेतन श्रीवंत, पोउनि. सुदाम सांगळे, पोउनि. किरण शिरसाठ, पोह. प्रदीप म्हसदे, विशाल काठे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, नाजीमखान पठाण, रोहिदास लिलके, पोअं. मुक्तार शेख, अमोल कोष्टी, मपोअं. मनिषा सरोदे यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
मुक्ताईनगर प्रतिनिधी (धनराज मांडवकर ) शहरात सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ...
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न
बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे)
स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे..
पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...