Homeआरोग्यकामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करत असलेल्या पीडितेचा 6 महिन्यांनी...

कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करत असलेल्या पीडितेचा 6 महिन्यांनी अखेर गुन्हा दाखल!

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नाशिक आणि पोलीस वार्ता न्यूज यांनी पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक शहरातील एका महिला कामगाराला कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करावा लागला असून या संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेला तब्बल 6 महिने संघर्ष करावा लागला. पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामूळे पीडितेच्या तक्रारीकडे सातत्याने 6 महिने दुर्लक्ष होत होते.
तक्रारीत, पीडितेला तिच्या कामाच्या ठिकाणी वैयक्तिकरित्या त्रास देऊ लागल्याचे आढळले. तिच्या कामावर नजर ठेवणे, तिला टोमणा मारणे, लज्जास्पद मन दुखावेल असे बोलणे तसेच कामाच्या ठिकाणी सर्वांसमोर अपमान जनक वागणूक देऊन तिला असुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले. याबाबत कोणाला सांगितले तरी काही होणार नाही, पिडीतेला कामावरून काढून टाकण्याची तसेच बदली करण्याची धमकी दिली गेली होती.

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेच्या नाशिक विभागाच्या नेत्या सौ.स्वागता उपासनी आणि पोलीस वार्ता न्यूज उपसंपादक श्री.निकाळे यांनी पीडीतेचे म्हणणे ऐकून घेत, या प्रकरणात पुढाकार घेतला. त्यांनी पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून पोलीस अधिकार्‍यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, महिला आयोगाशी संपर्क साधला, संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात मदत केली.
शेवटी 28 जून 2025 रोजी सायंकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरनं- 190/2025 नोंदवण्यात आला, ज्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 च्या कलम 78, 79 व 351(2) अंतर्गत विनयभंगाचा व पिडीतेला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहे.

  • सौ.स्वागता उपासनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले..
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधीही गप्प बसणार नाही. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा होता आणि तो आम्ही यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
  • मनसे महिला सेनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी करण्यात येत आहे की..
 • अशा गंभीर प्रकरणांची तात्काळ दखल घेण्यात यावी,
 • संबंधित दुकानाच्या विशाखा समितीची सक्रीय चौकशी व्हावी,
 • संबंधित कंपनीवरही कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना सदैव अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक : उमेश फिरके, नाशिक, संपर्क : 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!