Homeआरोग्यइंडोफिल कंपनीचे बनावट एम-45 बुरशीनाशक उत्पादन तयार करून विकणाऱ्यांवर कृषि विभागाची धडक...

इंडोफिल कंपनीचे बनावट एम-45 बुरशीनाशक उत्पादन तयार करून विकणाऱ्यांवर कृषि विभागाची धडक कारवाई!

भुसावळ येथे पोलीस पथक व गुणनियंत्रण (Agriculture Quality Control Department) पथकातील सदस्य यांनी मिळून छापा टाकला, विना परवाना बुरशीनाशक उत्पादन आढळून आले.

पोलीस वार्ता, भुसावळ | भुसावळ शहर येथील वाल्मिक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या किटकनाशक उत्पादक कंपनीचे मॅकोझेब 75% wp हे शेती उपयोगी बनावट किटकनाशक ‘एम’ नावाने अधिकृत विक्री होत आहे. तसेच सदर कंपनीचा लोगो, ब्रँडचे नाव व समान रंग संगती असणारे पाकिटे तयार करून बनावट एम-45 बुरशीनाशक शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी तयार केले आहे, अशी सर्व गोपनीय माहिती सूत्रांकडून जिल्हा कृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण पथक अधिकारी (Chief Quality Control Officer) विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार यांना मिळाली होती.
त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.
संशयीत आरोपी यांच्या वाल्मिक नगर, भुसावळ येथे पोलीस पथक व गुणनियंत्रण पथकातील सदस्य यांनी मिळून छापाi टाकला असता विना परवाना बुरशीनाशक उत्पादन, व ते साठवणूक करत असल्याचे आढळून आले.
सदर छाप्यात बनावट एम-45 बुरशीनाशकाची पाकिटे 1010, बुरशीनाशक म्हणून वाल पुट्टीच्या बॅग, सिलिंग मशीन, बनावट पाकिटे इ. एकूण 3,87,360/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संशयीत आरोपी यांना परवाना व उत्पादन विषयी कागदपत्रे व पुरवठादार यांच्या विषयी माहिती विचारली असता ते ती देऊ शकले नाही. छाप्यातील बनावट साठा जप्त करून, त्याचे नमुने घेण्यात आले व बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ येथे अधिकृत उत्पादक यांच्या वतीने प्रदीप झा तुमच्या फिरायणीवरून पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपुर्ण कारवाई दरम्यान श्री प्रदीप द्याडे कृषी अधिकारी पंचायत समिती भुसावळ, मानसिंग भोळे कृषी सहायक भुसावळ, सुमन राठोड म.पो.कॉ प्रशांत परदेशी यांचे सहकार्य लाभले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, भुसावळ हे करीत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: विनायक पाटील, भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावे – उमेश नेमाडे

0
भुसावळ : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही...

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

error: Content is protected !!