Homeआरोग्यवणी येथे प्रायव्हेट कंपनीची मनमानी; 65 कामगारांना अचानक केले कामावर कमी, कामगारांचे...

वणी येथे प्रायव्हेट कंपनीची मनमानी; 65 कामगारांना अचानक केले कामावर कमी, कामगारांचे आमरण उपोषण!

27 जानेवारी पासून सकाळी 11 वाजेपासून कामावरून कमी केलेले सर्व कामगार एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार आहे.

पोलीस वार्ता, यवतमाळ : तालुका वणी येथील एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा.लि. या कंपनीत कार्यरत असलेल्या 65 कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्याचा प्रकार या कंपनी व्यवस्थापकांकडून करण्यात आला आहे. अचानक कंपनी मधून काम गेल्याने या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असून कामगारांनी कंपनी व्यवस्थापकांविरोधात आता एल्गार पुकारला आहे.
येत्या दि.27 जानेवारी पासून कामावरून कमी केलेले सर्व कामगार एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार आहे. याबाबत कामगारांनी वणी उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान कंपनीच्या या भूमिकेवर कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी कामगारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सदर कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी. उत्खननाचे काम करते. गेल्या 5 वर्षांपासून या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर गाड्या व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर गाड्या सुरु आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणाऱ्या 65 कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे.

वणी येथील कंपनी गेटवर 27 जानेवारी, सकाळी 11 वाजेपासून कामगार उपोषणाला सुरुवात करणार आहे. हा भूमिपुत्रांवर अन्याय असून, वेकोलिसाठी स्थानिकांनी आपल्या जमीन दिल्या. शेती गेल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अनेक स्थानिकांचा रोजगार गेला. वेकोलिमुळे होणा-या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रदूषणाचा स्थानिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. वेकोलिला प्रगतीत भूमिपुत्रांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र वेकोलिसाठी काम करणा-या कंपन्या आता भूमिपुत्रांच्याच जिवावर उठल्या आहेत. हा भूमिपुत्रावरचा अन्याय सहन केला जाणार नाही. कंपनीने तात्काळ कामगारांना नोकरीवर रुजू करावे. असे संजय खाडे यांनी कामगारांशी बोलताना सांगितले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात कंपनी व्यवस्थापकांना कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची विनंती केली आहे. निवेदन देत्या वेळी प्रभाकर खोब्रागडे, संजय पारशीवे, कान्हू तामगाडगे, महेश गोवरदिपे, अनिल डोंगे, योगेश कामतवार, प्रकाश इंगोले, सुरेश पारशीवे, वासुदेव चिडे, किसन खेडेकर, अरुण डाहूले, प्रवीण कातरकर, श्रीकांत निंदेकर, संजय वऱ्हाटे, प्रकाश नागोसे, रवि गुरनुले, संदीप नांदे, संजय वासनकर, आकाश गोबाडे, तुळशीदास धांडे, सुनील कातरकर, विजय खुटेमाटे, दिलिप काकडे, गणेश सातपुते, भाऊराव काकडे, मिथून निब्रड, विशाल गोवारदिपे, पुरुषोत्तम पाचभाई, राजू ढपकर, वैभव खाडे, हरिभाऊ खेडेकर, संतोष राजूकर, अनिल बोबडे, अरुण असिनकर, दीपक खुसपुरे, सुभाष पिंगे, गणेश पारशिवे, मंगेश देरकर आदी सर्व मोठ्या संख्येने होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!