आंबेडकर हौसिंग सोसायटीतील रहिवाशांना न्याय द्यावा, व लोकांच्या आक्रोशाला कारण ठरणाऱ्या या वराह/डुक्कर पालन व्यवसायाला लवकरात लवकर सोसायटीतून हटवावे..
पोलीस वार्ता, सातारा : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पाडेगाव याठिकाणी असलेल्या आंबेडकर हौसिंग सोसायटी या लोकवस्तीत सुरू असलेले वराह/डुक्कर पालन फॉर्म हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे.
यासंदर्भात ‘वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ यांच्यावतीने मंगळवारी दि.11 मार्च रोजी मा.बापूसाहेब ढावरे यांच्या नेतृत्वाखाली सलीमभाई शेख यांच्या हस्ते खंडाळा येथील नायब तहसीलदार मा.चेतन मोरे साहेब व सहगटविकास अधिकारी मांढरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मागील पाच ते सहा वर्षांपासून नागरिकांना या चाललेल्या डुक्कर पालन फार्ममुळे कितीतरी आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. सोसायटी परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेले असते, रहिवासी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वस्तीतील महिला भगिनी, वयोवृद्ध शाळकरी मुलांना येता-जाताना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रहिवासी सोसायटीतील लग्न होऊन बाहेर सासरी गेलेल्या मुली, या दुर्गंधी व घाणीमुळे परत सोसायटीत माहेरी येण्यासाठी टाळतात. तसेच सोसायटीत कोणी पाहुणे देखील येण्यास नकार देतात. हा त्रास सद्या रहिवाशी लोकांना सहन करावा लागत आहे, बरेच लोक या डुक्कर पालन व्यवसाय असलेल्या घाणीच्या त्रासाला वैतागून सोसायटी सोडून दुसरीकडे राहिला गेलेत. तरी प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन, नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या स्थानिक आंबेडकर हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना न्याय द्यावा, व लोकांच्या आक्रोशाला कारण ठरणाऱ्या या वराह/डुक्कर पालन व्यवसायाला/फार्मला लवकरात लवकर सोसायटीतून हटवावे. ही विनंती निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली असून कारवाई न केल्यास ‘वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या वतीने नागरीकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
निवेदन खंडाळा नायब तहसीलदार यांना सादर करतेवेळी, पदाधिकारी स्वप्निल जावळे, राहुल येळे, विशाल भोसले, नागेश बरकडे, सोनाजी बरकडे, प्रशांत बरकडे, दादासो अवघडे, देविदास वाघमारे, बिपिन मेनन, अनिकेत लवांडे, अनिकेत मोरे, सौरभ जाधव, जावेद शेख, कार्तिक बेंगळे, अमर अतार, बबलू सय्यद, आज्जो सय्यद, सरफराज मुल्ला, शकील शेख, शाहरुख सय्यद, मोसिन शेख, आदी सदस्य, नागरिक उपस्थित होते.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...