पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने तातडीने करून याचा अहवाल सादर करावा..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दि.11 मे रोजी दुपारी पांढुर्ली येथे केली.
यावेळी सिन्नर तालुका तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाथे आदी उपस्थित होते. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने तातडीने करून याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री कोकाटे यांनी यावेळी दिल्या.






































