Homeक्राईममहिलांन वर होनारे अन्याय सहन करनार नाही डीवायएसपी व तहसीलदारांना दिले निवेदन...

महिलांन वर होनारे अन्याय सहन करनार नाही डीवायएसपी व तहसीलदारांना दिले निवेदन पत्र

सातारा ( प्रतिनिधी मीनाक्षी पोळ ) जिल्हा पाटण तालुका येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीरामाचे मंदिर असलेले चाफळ या गावच्या पोलीस स्टेशनच्या तीन पोलिसांनी एका दलित व गरीब कुटुंबातील महिलेस घरात घुसून कोणी नसताना पट्ट्याने बेदम मारहाण केलीआहे त्या महिलेचे नाव सुनिता नथुराम गायकवाड असे आहे वय 45 राहणार माजगाव तालुका पाटण येथील ही रहिवासी असून हे गाव चाफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते सदर घटना दि.23/3/2025 रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास पिडीत महिला घरी एकटी असताना चाफळ पोलीस स्टेशन च्या तीन कर्मचाऱ्यांनी तिला घरामध्ये घुसून मारहाण केली असे या महिलेचे म्हणणे आहे ही महिला घरात एकटे असताना चाफळ पोलीस स्टेशनचे एक महिला कर्मचारी अचानक घरामध्ये आली ती पोलिसांच्या वर्दीमध्ये होती घरात कोणीही नव्हते आत आल्या आल्या डायरेक्ट तिच्या कानफडीत मारण्यास सुरुवात केली मी काय केले आहे म्हणून तु मला मारत आहेस बाळा मी तुझ्या आईच्या वयाची आहे मला मारू नकोस तुझ्या आईला तू अशी मारशील का मला मारायचे असेल तर पूर्ण मारून टाक नाहीतर फासावर लटकव पण मला का मारतेस त्याचं कारण तरी सांग असे म्हणताच ती लगेच बाजूला झाली. त्यानंतर तिच्या पाटो पाठ एक तब्येतीने जाड असलेला पोलीस जेन्ट्स घरामध्ये आला व त्याने मला पट्ट्याने मारण्यास सुरुवात केली मी जोर जोरात ओरडत होते मला का मारताय मला मारण्याचे कारण तरी सांगा मी हात जोडत होती गयावया लोळत होते वेदना सहन होत नव्हत्या तरी पण तो मारतच राहिला नंतर तिसरा पोलीस घरामध्ये आला त्याने जाड पोलिसाच्या हातातील पट्टा ओढून घेऊन मला मारण्यास सुरुवात केली मला खूप वेदना होत होत्या तरीही मारायचे थांबत नव्हते माझ्या पाठीवर हातावर मांडीवर माझ्या आतील पूर्ण शरीरावर मारले आहे तिसऱ्यांदा जो पोलीस मला मारत होता त्याचे नाव शेडगे असे होते मला लिहिता वाचता येत नाही मी पूर्ण अशिक्षित आहे परंतु मला मारताना ते तिघे एकामेकांच्या बरोबर बोलत होते त्यामुळे शेडगे हे नाव मला कळाले की त्या पोलिसाचे नाव शेडगे आहे जाता जाता मला म्हणाला दम असेल तर पोलीस स्टेशनला ये मग मी थोड्या वेळाने चाफळ पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनला टाळे होते त्यानंतर मल्हार पेठ येथे गेले तेथे पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला तरी माझी तक्रार कोणीही घेतली नाही घरी आले माझ्या मुलाला घेऊन मी पोलीस स्टेशनला गेले तरीही माझी तक्रार घेतली नाही आम्ही तिथे उभे असताना तेवढ्यात मला मारलेले दोन्ही पोलीस तिथे दिसले मचले नावाचे साहेब होते त्यांना मी लगेच त्या दोन पोलिसांच्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले हे बघा हीच ती दोघं याच दोघांनी मला पट्ट्याने मारलं माझ्या मुलीने नंतर तक्रार लिहून दिली तरी त्याचीही दखल घेतली नाही म्हणुन आम्ही अखिल भारतीय मजदुर कल्याण सेवा संघ नवी दिल्ली भारत सरकार या संघाच्या पुणे मंडल अध्यक्ष आणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मंच उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी पोळ मॅडम यांच्या ऑफिसला उंब्रज या ठिकाणी गेलो त्यांनी आमचे पूर्णपणे तक्रार ऐकून घेतली आणि त्या म्हणाल्या मी बावीस वर्षे झाली पोलीस स्टेशनला महिला दक्षता आणि पंच म्हणून नको तसली काम केली महिलांवर होणाऱे अन्याय अत्याचार यांना न्याय देण्याचे काम केले एक्सीडेंट झालेल्या महिलांचे अवशेष हाताने हॅंडग्लोज घालुन पोलिसांच्या बरोबर भरू लागले नदीत वाहून आलेल्या प्रेतांचे पंचनामे करु लागले पेटवून घेतलेल्या महिलांचे विहिरीत पडलेल्या प्रेतांचे पंचनामे केले सडलेल्या मृत देहांचे पंचनामे केले प्रत्येक अन्याय झालेला व्यक्तीला न्याय देण्यासाठी उभी राहिले खुप सहकार्य केले परंतु मला असला प्रकार कधीही पाहायला मिळाला नाही झालेला प्रकार हा चुकीचा व खूप भयानक आहे म्हणून मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचे काम करेल असे पोळ मॅडम म्हणाल्या तुम्हाला झालेल्या झालेल्या मारहाणीची चौकशी करून पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे हे जे मारलेले आहे ते फार चुकीचे आहे पोलिसांना एका महिलेला मारण्याचा अधिकार दिला कोणी तरी त्या म्हणाल्या आजही तुमची अवस्था पाहून खूप वाईट वाटत आहे आणि आज एक महिला म्हणून व सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे बोलल्यानंतर आम्हाला खूप आधार वाटला पोळ मॅडम यांनी नी माझ्याकडून घडलेली सर्व हकीकत ऐकून घेतली व लिहून घेतली लिहून घेतले आणि त्या आमच्याबरोबर माझ्या घरी आल्या मी त्यांना सर्व वस्तुस्थिती दाखवली त्यांनी मला कुठे मारले ते घरामध्ये कसे आले मला कशी मारहाण झाली मला कसाही मारले मी कसे ओरडत होते घाबरत होते यावेळी मला माझ्या मुलाचा फोन येत होता मी तो उचलला आणिमी कानाला लावणार तेवढ्यात माझ्या हातातील मोबाईल पोलिसांनी हीसकावून घेऊन कोठे फेकला हे सर्व सांगितले व दाखवले त्यानंतर आम्ही पोळ मॅडम बरोबर मल्हार पेठ पोलीस स्टेशनला गेलो माझी मुलगी राणी व पोळ मॅडम आम्हाला मल्हार पेठ पोलीस स्टेशनच्या पी एस आय सुनिता शेळके मॅडम त्यांच्याकडे गेलो त्यांनी माझ्या अंगावर उठलेले वळ पाहिले त्या म्हणाल्या पोलीस असे मारणारच नाहीत काहीतरी कारण असेल मग मी म्हणाले जर कारण काही असेल तर मला दाखवा माझी काय चुक होती मी कोणाचा खुन केला आहे का मी कुणाची चोरी केली आहे का मला कशासाठी मारले ते सांगा तरीसुद्धा पोलिसांना त्याचे कारण सांगता आले नाही किंवा माझ्या विरोधात कोणाचेही तक्रार आली असेल तर दाखवा पी एस आय मॅडम दोन-तीन वेळा म्हणाल्या उगीच मारणार नाहीत काहीतरी कारण असेल आम्हाला कळले तू दारू पितेस घरामध्ये दंगा करतेस अशा मी त्यांना म्हणाले मला एक तरी तक्रार दाखवा त्या मला एकही तक्रार दाखवू शकल्या नाहीत शेळके पी एस आय मॅडम म्हणाल्या ठीक आहे आता झाले ते झाले आता आपण झालेली हकीकत परत आणू शकत नाही आता काय करायचे तुम्हाला आमच्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत म्हणजे तुम्ही शांत बसाल तर मी त्यांना म्हटलं ज्या पट्ट्याने मला मारहाण केली आहे तो पट्टा माझ्या हातात द्या आणि मला जिथे मारले तिथे मी त्यांना मारते जसे माझ्या अंगावर वळ उठले आहेत तसे त्यांच्याही अंगावर उठू देत मग मी माघार घेते असे नाही केले तर रोज उठून गावातले कोणीही शेंबडी पोर मला मारायला कमी करणार नाही असे केले तर मी माघार घेईन तुमची तयारी आहे का असे म्हणताच शेळके मॅडम म्हणाल्या कसं चालेल म्हणजे आम्हाला मारतांना सगळं चालतंय का आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला कोणी विचारणार नाही म्हणून की आम्ही दलित आहे म्हणून कोणत्या कारणाने मला मारले त्याचे कारण सांगा त्यांना कोणतेही कारण सांगता आले नाही मग मला विचार पडला आहे मला मारलं का हा माझा पोलिसांना प्रश्न आहे मला एवढे बेदम मारलं आहे की माझ्या शरीरावर कोठेही वळ उठले नाहीत अशी जागा राहिलेली नाही परंतु मी त्यांना म्हणाले मला मारण्याचे कारण काय सांगाव एका दलित महिलेला मारण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी यांना माझ्या विरोधात कोणतीही तक्रार आलेली नाही आणि जरी आली असेल तर ती मला दाखवावी माझे पोलिसांना एकच म्हणणे आहे मला मारलं का याचे उत्तर मला मल्हार पेठ पोलिसांकडून मिळाले नाही म्हणून मी आणि माझी मुलगी राणी व सोबत अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या पुणे मंडळ अध्यक्षा पोळ मॅडम व एक सामाजिक कार्यकर्त्या महालक्ष्मी आदर फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा शेलार मॅडम सर्वजण एस पी ऑफिसला गेलो पोळ मॅडम यांनी संघाच्या लेटर पॅड वरती माझी सर्व हकीकत लिहून घेतली व त्यांनी एसपी ऑफिस सातारा यांना निवेदन देण्याचे ठरवले जर न्याय नाही मिळाला तर त्यांनी संघटनेच्या नावाने पत्र लिहिले व एस पी साहेबांना भेटण्यासाठी गेलो परंतु आम्हाला एसपी साहेबांची भेट झाली तेथे दरवाज्याच्या बाहेर बसलेले एक पोलीस होते त्यांनी मला विचारले काय काम आहे कशासाठी आला आहे तुमचे नाव सांगा तुम्ही कशासाठी आला आहे ते सांगा असे म्हणून त्यांनी नाव वहीमध्ये नोंद करून घेतले मी त्यांना झालेली सगळी हकीकत सांगितली आमचा एवढा गंभीर विषय ऐकून त्यांनी आम्हाला आत पाठवायचे सोडून लगेच स्वतःच्या खिशातील मोबाईल काढला व कोणालातरी फोन करून आमच्याबद्दल सांगितले आम्ही तिथे आलो आहे म्हणून मला थोडा वेळ खूप वाईट वाटले ह्या पोलिसांची अशी साखळी असेल तर गरिबाला न्याय कसा मिळेल आंम्हाला एसपी साहेबांनाच भेटायचे होते परंतु त्यांची मिटींग चालू होती अडीच तीन तास आम्ही तेथे थांबलो त्यानंतर ॲडिशनल मॅडम यांची भेट झाली त्याही अशाच म्हणाल्या तू दारू पितेस तुझी काहीतरी चूक असेल तुझ्याबद्दल तक्रारी आहेत मी त्यांनाही म्हणाले माझ्याबद्दल तक्रारी आहेत त्या मला दाखवा मी असे काय केले आहे म्हणून मला एवढे मारले आहे यानंतर ॲडिशनल एस पी मॅडम म्हणाल्या आम्ही पाहतो काय झाले आहे ते एवढेच बोलल्या तिथेही न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही साताऱ्या मधून निघून आलो असे माझ्या मणाला खुप वेदना झाल्या व वाईट ही वाटले पोलीस आमचे रक्षक आहेत की भक्षक आहेत आज माझ्यावर एवढा अन्याय अत्याचार होऊनही मला न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्यांनी न्याय मागायला जायचं कुणाकडे पोलीसच असा मुजोरपणा करायला लागले तर पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे. साहेब पण अजून सुद्धा माझ्याबद्दल कोणाची तक्रार आहे मला का मारले याचे कारण कळाले नाही आम्हाला एसपी ऑफिसला सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून मी परत आले त्यानंतर मीनाक्षी पोळ यांनी सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब व पाटण तालुक्याचे

डीवायएसपी साहेबांना एक निवेदन दिले तसेच पाटण तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनाही निवेदन दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब तसेच त्याचप्रमाणे आमच्या पाटण तालुक्याचे मंत्री साहेब शंभुराजे देसाई साहेब आपण सर्व पाटण तालुक्याला न्याय देण्याचे काम करता आपण मला ही न्याय द्यावा आपण आजपर्यंत आपल्याकडे आलेल्या कोणत्याही गरिबाला व अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचे काम पदावर असतांना किव्वा नसतांना सुध्दा अन्याया विरुद्ध आवाज उचलुन न्याय देण्याचे कार्य खुप वर्षापासून करत आला आहे मला आपण तरी न्याय द्याल अशी माझी अपेक्षा आहे लवकरात लवकर मला न्याय मिळावा ज्यांनी मला मारले आहे त्या तीन पोलिसांचे नाव पोलीस सुतार मॅडम पोलीस शेडगे पोलीस वेताळ अशी तिघांना ही जागेवर कार्यमुक्त करावे अशी माझी मागणी आहे मला न्याय मिळाला नाही तर येत्या 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी अकरा वाजता पाटण तालुका तहसील कार्यालयाच्या समोर मी स्वतः व अखिल भारतीय मजदुर कल्याण सेवा संघाच्या मिनाक्षी पोळ उपोषणास बसणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...
error: Content is protected !!