स्पर्धेचा विषय होता, “क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले” या विषयावर झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी आणि कवयित्री पुरस्कार..
पोलीस वार्ता, सोलापूर | महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी ठरले,मा.कवी ‘गणेश रामदास निकम’ तर महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ठरल्या कवयित्री कांचनगंगा मोरे..स माजातील तळागाळापर्यंत बौद्धिक प्रगती होऊन मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक महापुरुषांनी, संतांनी, समाजसुधारकांनी समाजाला महत्वपुर्ण असे मार्गदर्शन केले आहे. लेखनाद्वारे, भाषणाद्वारे, भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, कविता, गीते, नाटक, इत्यादीच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले. आधुनिक जगात वावरतांना मनुष्य चांगल्या विचारापासून भरकटला जाऊ नये यासाठी आजच्या काळात देखील विविध प्रकारच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन सुरूच आहे. असाच एक प्रामाणिक प्रयत्न “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंचाचा” आहे.
या अनुषंगाने “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र.3 घेण्यात आली होती. या स्पर्धेचा विषय होता, “क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले” . या विषयावर झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. या काव्यलेखन स्पर्धेत “महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान यावेळी कवी गणेश रामदास निकम, गणेशपूर चाळीसगाव यांना मिळाला आहे. त्यांचे अनेक वृत्तपत्रातून कविता, लेख, ललित लेख प्रकाशित आहेत. ते अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित आहेत तसेच अनेक काव्यलेखन स्पर्धांमध्ये ते विजेते झाले आहेत.
या स्पर्धेत “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” चा मान मिळाला आहे कवयित्री कांचनगंगा मोरे, काक्रंबा तुळजापूर यांना. आजवर त्यांचे अनेक साहित्य विविध माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. ‘क्षितिजापार’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांना बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून तीनदा आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
थोर समाजसुधारक व संतांच्या शिकवणीतून समाजाचे प्रबोधन सातत्याने होत रहावे या प्रांजळ हेतूने या ऑनलाईन साहित्य समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. या समूहाचे संस्थापक मा.देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान. हे असून वैशाली सुर्यवंशी व सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत. प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra medical council) मुंबई...
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन
रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...